120 किमी प्रतितास वेगाने येतंय नवं संकट, महाराष्ट्राला अतिमुसळधार पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ सक्रिय झालं आहे. या चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ सक्रिय झालं आहे. अर्नव चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं, अर्नव चक्रीवादळानंतर आता आणखी एक चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुरासू नावाचं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं आहे. हे चक्रीवादळ प्रचंड वेगाने पुढे सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपासून अवघ्या 160 किलोमीटर अंतरावर आहे. जेव्हा हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकेल तेव्हा प्रति तास 120 किलोमीटर वेगाने वारं वाहण्याची शक्यता आहे. (rains) सोबतच अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेलं हे चक्रीवादळ ‘मुरासू’ सोमवारी सकाळी पश्चिम-उत्तर -पश्चिम दिशेनं पुढे सरकलं असून ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचलं आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ मुरासू आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या काळात प्रति तास 100 ते 110 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग प्रति तास 120 किलोमीटरपर्यंत देखील वाढण्याची शक्यता आहे. सध्या हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात 14.1 डिग्री उत्तर अक्षांशच्या जवळपास आहे. हे चक्रीवादळ सोमवारी रात्री आकरा ते मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास नेल्लोर ते नरसापूरदरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. याकाळात वाऱ्याचा वेग हा प्रचंड असणार आहे, (rains) तसेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. बिहार, झारखंड, आणि उत्तर प्रदेश या राज्यांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (rains) हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा : 

नोव्हेंबरमध्ये बँका एकूण 17 दिवस बंद असणार, महाराष्ट्रात किती दिवस

लेक लाडकी योजनेच्या नियमात मोठा बदल, आदिती तटकरे यांची मोठी घोषणा, आता थेट

ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी लवकरच संयुक्त बैठक घेणार : पालकमंत्री