आता आम्ही बदला घेणार, ममता बॅनर्जींनी भाजपाचं टेन्शन वाढवलं, भर मंचावर सांगितला पुढचा प्लॅन

निवडणूक हायजॅक करण्यात आली. ज्ञानेश कुमार कधी जातील याची आम्ही वाटत पाहात आहोत, असे बोलत त्यांनी जॉनी जॉनी येस पापा या बालकवितेचा आधार घेत भाजपा, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीने महारॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये विरोधी पक्षातील सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. विशेष म्हणजे या रॅलीला देशभरातून लोक दिल्लीमध्ये जमा झाले आहेत. (election) दरम्यान, याच महारॅलीत पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर सडकून टीका केली. भाजपावर बोलताना त्यांनी बंगालच्या पराभवाचा जशास तसा बदला घेऊ, असा इशारा दिला. विशेष म्हणजे जॉनी जॉनी येस पापा या बालकवितेचा उल्लेख करत भाजपा आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर खरमरीत शब्दांत टीका केली.

आपल्या भाषणात बोलताना एसआयआर प्रक्रियेचा बंगाल बळी ठरला, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. (election) तसेच आम्ही सोडणार नाही. प्राण गेला तरी चालेल पण आम्ही लढणार. आम्ही लोकशाहीला वाचवू, असा निर्धार यावेळी त्यांनी केला. एसआयआर म्हणजे स्पेशल इन्सेटिव्ह रिलिफ टू बाजेपी. लोकशाही, संविधान, अधिकार लूटण्यात आले. बंगालमध्ये एक कोटीपेक्षा जास्त मतदारांचा अधिकार काढून घेण्यात आला. आमचा पराभव झालेला नाही. आम्हाला हरवण्यात आलं. आम्ही याचा बदला घेऊ. आम्ही हा बदला लोकशाहीने घेऊ. आम्ही लढा लढू, असेही पुढे बॅनर्जी म्हणाल्या.

निवडणूक हायजॅक करण्यात आली. ज्ञानेश कुमार कधी जातील याची आम्ही वाटत पाहात आहोत, असे बोलत त्यांनी जॉनी जॉनी येस पापा या बालकवितेचा आधार घेत भाजपा, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “व्हॅनिश व्हॅनिश येस पापा, व्होट चोरी येस पापा, लोकशाही चोरी येस पापा, मतं लुटली बीजेपी पापा, इज्जत चोरली भाजपाने पापा, शेतकऱ्यांचा सन्मान चोरला बीजेपी पापा, मजुरांचे घर तोडले बीजेपी पापा,” अशी कविता म्हणत त्यांनी भाजपावर तसेच निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर खरमरीत टीका केली. (election) तसेच बीजेपी पाहिजे का…नो पापा, ज्ञानेश कुमार हवेत का..नो पापा, असे म्हणत यापुढे भाजपाला सत्तेतून हाकला, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. अगोदर ज्ञानेश कुमार यांना हटवा मग पुढे बघू अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा : 

नोव्हेंबरमध्ये बँका एकूण 17 दिवस बंद असणार, महाराष्ट्रात किती दिवस

लेक लाडकी योजनेच्या नियमात मोठा बदल, आदिती तटकरे यांची मोठी घोषणा, आता थेट

ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी लवकरच संयुक्त बैठक घेणार : पालकमंत्री