राज्याच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पक्षाकडून नव्या १० प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली असून,(regarding) पक्षाची भूमिका राज्यासह राष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी खासदार फौजियाताई खान, राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार ॲड. अशोकबापू पवार यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.
बैठकीनंतर पक्षाकडून १० प्रवक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. (regarding) यामध्ये माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, ॲड. फैजल मिर्झा, महेबूब इब्राहीम शेख, प्रवीण कुंटे पाटील, प्रशांत सोनबा वीरकर, ॲड. हेमाताई पिंपळे आणि डॉ. चंद्रकांत बारेला यांचा समावेश आहे.
नव्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून पक्षाची राजकीय भूमिका अधिक आक्रमकपणे जनतेसमोर मांडण्याची रणनीती असल्याचं मानलं जात आहे. सध्या राज्यात विविध राजकीय मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू (regarding) असताना राष्ट्रवादीकडून प्रवक्त्यांची नवी टीम जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाची भूमिका मांडताना हे प्रवक्ते कोणत्या मुद्द्यांवर आक्रमक होतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :
अजितदादा, तू कुठूनतरी अचानक येशील, अन् राखी पौर्णिनिमित्त सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट?
सप्टेंबर महिना मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरणार, साखर, दूधनंतर आता प्रवासही महागणार?
एकामागून एक महाआपत्ती नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?