मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नाराज झाला आहे. या नेत्याने भाजप नेत्यांवरच गंभीर आरोप केले आहेत. या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

केंद्रीय मंत्री,भाजपचे वरिष्ठ नेते जुएल ओराम यांनी पक्षातील नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. पक्षातील नेते मला केंद्रीय मंत्रिपदावरून हटवण्यासाठी षडयंत्र रचत आहेत. माझी राजकारणात विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप जुएल ओराम यांनी केला आहे. जुएल यांच्या आरोपाने ओडिशातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
केंद्रीय मंत्र्यांचे जवळचे नेते राकेश पासवान यांच्या अटकेनंतर चर्चांना उधाण आलं आहे. ओडिशातील संघटीत गुन्हेगारी प्रकरणात पोलिसांनी राकेश पासवान यांना ताब्यात घेतलं. पासवान यांनी सरकारी अतिथी गृहात गुन्हेगारांना आश्रय दिल्याचाही आरोप आहे. (political) परंतु पासवान यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणावर जुएल ओराम यांनी म्हटलं होतं की, कायद्याला त्याचं काम करू दिलं पाहिजे. कायदेशीर कारवाईवर कोणतीही आक्षेप नाही. यावेळी त्यांनी पक्षातील नेत्यांवरच हल्लाबोल केला.
ओराम हे सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ओराम म्हणाले, ‘पक्षातील काही लोक पाण्यासारखा पैसा माझ्या बदनामीसाठी खर्च करत आहे. केंद्रीय मंत्रिपदावरून हटवण्यासाठी काम सुरू आहे. त्यांना माझं केंद्रीय मंत्रिपद हवं आहे’. (political) दरम्यान, जोराम यांनी यंदा लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. आता परिस्थिती पाहून 2029 साली लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करेल’.
ओराम यांनी म्हटलं की, माझ्या विरोधात काम करणाऱ्यांमध्ये एका गट सामील आहे. यावरून ओराम यांनी भाजपचे संघटन महामंत्री यांना थेट तक्रार केली. ओराम यांनी रागाच्या सरकारला मोठा इशारा दिला. मला काही लोक बदनाम करू पाहत आहे. माझी त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची क्षमता आहे. माझ्यात हात कापण्याची देखील हिंमत आहे, अशा शब्दात संताप व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री जोराम यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून ओडिशामधील बीजू जनता दल आणि काँग्रेसने सत्ताधारी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. बीजेडी नेते प्रमिला मलिक यांनी म्हटलं की, ‘ओरामहे राज्यातील आदिवासी समाजातील बडे नेते आहेत. (political) त्यांच्या वक्तव्यावरून भाजपमधील अंतर्गत मतभेद किती खोल आहेत, हे दिसून येते. पक्षातील नेते जनतेचं काम करण्याऐवजी अंतर्गत वादात गुरफटले आहेत’. काँग्रेसनेही भाजपवर जोरदार निशाणा साधला.
हेही वाचा :
अजितदादा, तू कुठूनतरी अचानक येशील, अन् राखी पौर्णिनिमित्त सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट?
सप्टेंबर महिना मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरणार, साखर, दूधनंतर आता प्रवासही महागणार?
एकामागून एक महाआपत्ती नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?