मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये मे महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्याप हप्ता जमा झालेला नाही. मार्च-एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या १५ नंतर जमा झाला होता, (Ladki Bahin Yojana) त्यामुळे यावेळीही विलंब होत असल्याने महिलांमध्ये चिंता वाढली आहे.

महिला व बालविकास विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्रता पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सरकारकडून हप्त्याची रक्कम वर्ग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, १२ ते १५ जून दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात मे महिन्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात होईल, (Ladki Bahin Yojana) अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. ई-केवायसी (e-KYC) पडताळणीनंतर योजनेच्या अनेक लाभार्थींना अपात्र ठरवण्यात आले आहे. विविध रिपोर्ट्सनुसार, ८० लाख महिलांचा लाभ बंद झाला असून, केवळ १ कोटी ६६ लाख महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र ठरलेल्या महिलांना हप्ता मिळणार नाही. शासकीय सूत्रांनी सांगितले की, मार्च-एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या वितरण रखडण्यामागे मुख्य कारण बँक खात्यांचे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) अपडेशन आहे. याशिवाय,बँक खाते आधार कार्डशी लिंक नसणे,बँक खात्यात इतर त्रुटी,अर्जाची स्थिती अद्याप प्रलंबित असणे या कारणांमुळे पैसे जमा होण्यास अडचण येत आहे.
महिलांनी तातडीने करावयाच्या गोष्टी
१. बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे की नाही, हे बँकेत किंवा UIDAI पोर्टलवर तपासा.
२. बँक खात्याचे DBT (Direct Benefit Transfer) स्टेटस ॲक्टिव्ह आहे का, याची खात्री करा.
३. योजनेच्या अधिकृत पोर्टल किंवा ॲपवर अर्जाची स्थिती ‘मंजूर’ (Approved) आहे का, हे तपासा.
जर काही समस्या असतील तर जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात संपर्क साधावा, असे सूत्रांनी सांगितले. महिला व बालविकास विभागाने योजनेची अंमलबजावणी अधिक वेगाने करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पात्र महिलांना लवकरात लवकर हप्ता मिळावा, (Ladki Bahin Yojana) यासाठी सरकार सक्रिय आहे.
हेही वाचा :
‘तर थेट कारवाई करू’ महाविद्यालयांना मोठा झटका
भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, VIDEO द्वारे व्यक्त केली नाराजी
“आता रम्मी नाही तर आता तीन पत्ती खेळ सत्ताधारी कलंकित मंत्र्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा ‘आक्रोश’