अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दानचोरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कमालीचा आक्रमक झाला आहे. पक्षाने याविरोधात ‘रामरक्षा आंदोलन’ पुकारले असून, (Ayodhya) यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर तीव्र शब्दांत निशाणा साधला. “आम्ही कडवट आणि देशाभिमानी हिंदू आहोत; भोळे आहोत, पण मूर्ख नाही. आमचे धनुष्यबाण जरी चोरले गेले असले, तरी हनुमानाच्या मशालीने जशी रावणाची लंका जळाली होती, तीच मशाल आज आमच्या हाती असून आम्ही अन्यायाची लंका जाळू,” अशा शब्दांत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध रिलस्टार हिंदुस्थानी भाऊ याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ प्रसारित करत ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

“सप्टेंबरपर्यंत बरेच काही गमावाल”; हिंदुस्थानी भाऊचा राजकीय सट्टा बिग बॉस फेम हिंदुस्थानी भाऊ याने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना जाहीर इशारा दिला आहे. राज्यातील आगामी राजकीय बदलांचे संकेत देत तो म्हणाला “उद्धव साहेब, मी यापूर्वीच आपल्याला सावध केले होते. पक्षात लक्ष द्या, नाहीतर १५ आमदार आणि २५ नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. सचिन अहिर यांच्या रूपाने हा पहिला बॉम्ब फुटला आहे. आगामी ७ सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा; सप्टेंबर महिन्यापर्यंत पक्षात मोठी पडझड पाहायला मिळेल.”
व्हिडिओमध्ये त्याने शिवसेना नेते संजय राऊत यांचा उल्लेख ‘भांडुपचा खोटा अनिल कपूर’ असा करत त्यांच्यावर उपरोधिक टीका केली. राऊत यांच्या ‘तुडवा ऑपरेशन’ या वक्तव्याचा समाचार घेताना, त्याने मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि ऐतिहासिक संदर्भांचा दाखला दिला. “अरुण गवळी उर्फ डॅडी आणि दगडी चाळीचे नाव सर्वांना माहीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, तुमच्याकडे दाऊद असेल तर आमच्याकडे गवळी आहे. (Ayodhya) त्यामुळे या खोट्या अनिल कपूरला तोंड बंद ठेवण्यास सांगा, अन्यथा त्यांचेच ‘तुडवा ऑपरेशन’ सुरू होईल,” असा टोला हिंदुस्थानी भाऊने लगावला.
‘मातोश्री’वर आमदारांची खलबते; नागपुरात होणार पुढील आंदोलन विरोधी गटात सुरू असलेल्या बंडखोरी आणि अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षाच्या आमदारांची तातडीने आणि अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली होती. सचिन अहिर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे या बैठकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. या बैठकीला संजय राऊत यांच्यासह बहुतांश सर्व आमदारांनी हजेरी लावली होती. केवळ परभणीचे आमदार राहुल पाटील हे घरगुती कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, (Ayodhya) ज्याची पूर्वकल्पना त्यांनी नेतृत्वाला दिली होती. या बैठकीत ‘ऑपरेशन टायगर’ला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्याचा पुनरुच्चार करण्याचे ठरले आहे. त्यानुसार चालू अधिवेशन संपल्यानंतर, पुढील आठवड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर येथे शिवसेनेचे भव्य ‘रामरक्षा आंदोलन’ छेडण्यात येणार असल्याची रणनीती निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा :
इचलकरंजी बनली चिखलकरंजी नागरिक संतप्त महापौरांचे कामे थांबवण्याचे आदेश?
नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा कृष्णामाई दत्तगुरूंच्या भेटीला भाविकांची स्नानपर्वणी?