विकसित महाराष्ट्राचे स्वप्न आपण पाहत आहोत. यात प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान महत्त्वाचे आहे. पण आपली भूमिका विरोधकांना पटणार नाही, ते विरोधाच्याच चष्म्यातून बघणार आहेत. (opposition) त्यांचा जन्म टिआरपीची लढाई जिंकण्यासाठी झाला आहे. तर भाजप कार्यकर्त्यांचा जन्म हा हिंदुत्वासाठी झाला आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांवर टीका केली.

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली असून, त्याच्या उद्घाटन प्रसंगी चव्हाण बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्य मंत्रीमंडळातील मंत्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, नितेश राणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार अशोक चव्हाण, माजी खासदार रावसाहेब दाणवे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आदी यावेळी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, राज्यातील १२४० मंडळांची जबाबदारी तरुण कार्यकर्त्यांवर आहे. (opposition) त्यांच्यातून चांगले वक्ते तयार करण्यासाठी प्रशिक्षण घेतले. डिजिटल प्लॅटफॉर्मवरून सुमारे १ लाख कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले आहे. पक्षाच्या विकासासाठी समर्पण दिले आहे, त्यांच्यामुळे आज पक्षाला अच्छे दिन आले आहेत.
भाजपच्या विचारधारेनुसार पुढील वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सरकारच्या योजना आणि कार्यक्रम पोहोचविण्यात येणार आहेत. शहरी भागात डिजिटल प्लॅटफॉर्मवरून भाजपविरोधी ‘फेक नरेटिव्ह’ पसरविला जात आहे, त्याला प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राला नशामुक्त करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. आपल्या बूथवरील कार्यकर्त्याला त्याच्या भागात अमली पदार्थ कोण विकत आहे याचा ग्राऊंड रिपोर्ट असतो. कार्यकर्त्यांनी अशा व्यक्तींची नावे सरकारपर्यंत पोचवा. (opposition) अशा व्यक्तींवर ‘मोका’ कायद्यानुसार कारवाई करून त्यांना अटक केली पाहिजे. देश, महाराष्ट्राला कोणत्या दिशेने जायचे आहे हे आपल्याला निश्चित करावे लागणार आहे.
हेही वाचा :
CNG दर वाढल्याने ऑटोचालकांचा ९ सप्टेंबरला संपाचा इशारा, केली मोठी मागणी?
राजकारणात खळबळ बडा नेता देणार राजीनामा तारीखही केली जाहीर?
एअरपोर्टवर अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेट १० मिनिटांच्या चर्चेने राजकीय चर्चांना उधाण?