दिल्लीमध्ये १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे दिल्ली हादरली आहे. दिल्लीच्या महरोलीमध्ये ही घटना घडली. सोमवारी सकाळी १० वर्षांच्या सुमारास अल्पवयीन मुलीचे टॅक्सी चालकाने अपरहण केले. (shocking) त्यानंतर त्याने मुलीवर बलात्कार केला. आरोपी ऐवढ्यावर थांबला नाही त्याने तर त्याने तिची हत्या केली.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेह महरौली येथील जंगलात नेऊन टाकला.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीमध्ये घडली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी टॅक्सी चालकाचे नाव बबलू (२५ वर्षे) आहे. पीडित मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. महरौली पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना आरोपी पीडित मुलीला घेऊन जाताना दिसला. (shocking) त्यानंतर पोलिसांनी अवघ्या ४ तासांत त्याला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीने पीडित मुलीचे सीडीआर चौकातील रस्त्यावरून अपहरण केले होते. (shocking) त्यानंतर तो तिला गुरूग्रामच्या जंगलात घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. जंगलामध्येच त्याने तिचा मृतदेह फेकून देत फरार झाला. पीडित मुलीचे कुटुंबीय रस्त्यावर झोपायचे.हत्या करण्यात आलेली मुलगी फुगे विकायची. तिचे आई-वडील मजुरीचे काम करायचे. पीडित मुलीच्या आई-वडिलांना चार मुलं आहेत. ते मूळचे बिहारचे आहेत. ते सर्वजण आधी भाड्याच्या घरात राहत होते पण आता ते रस्त्याच्या कडेला राहत होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :
समशितोष्ण कोल्हापूरमध्ये हरवत चाललेय ऋतुचक्र?