माझी लाडकी बहीण योजना(scheme) ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असून, पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. मात्र, अलीकडील पडताळणीत असे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत की, अनेक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब उघडकीस आल्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यावर खुलासा करत आकडेवारीही प्रसिद्ध केली आहे.
या योजनेचा(scheme) लाभ घेणाऱ्या अर्जदारांची सरकारकडून सखोल पडताळणी करण्यात येत आहे. यामध्ये ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे, किंवा ज्या महिलांच्या नावावर चारचाकी वाहनं आहेत अशा महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे. सर्वसामान्य लाभार्थींना मदतीचा योग्य फायदा मिळावा, यासाठी शासन विशेष दक्षता घेत आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिली की, “लाभार्थ्यांची पडताळणी” ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीचा एक नियमित भाग आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०२५ दरम्यान सुमारे २ लाख अर्जांची तपासणी झाली. त्यात २२८९ अर्ज अशा महिला सरकारी कर्मचाऱ्यांचे होते, जे या योजनेचे पात्र नव्हते.
या महिला कर्मचाऱ्यांनी योजना सुरु झाल्यानंतरही अर्ज दाखल करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नियमांचे उल्लंघन लक्षात आल्यानंतर या सर्व अर्जदारांना लाभ नाकारण्यात आला आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, अशा कोणत्याही अपात्र लाभार्थ्याला आता किंवा पुढेही कोणताही लाभ दिला जाणार नाही.
हेही वाचा :