दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून गावाकडे परतत असताना २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अनिकेत रजनीकांत निकम असे मृत गोविंदाचे नाव आहे. (returning) या घटनेमुळे शिरोळमध्ये हळहळ व्यक्त होत असून, हनुमान तालीम मंडळाच्या गोविंदा पथकातील सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

शिरोळ येथील हनुमान तालीम मंडळाचे गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी सरवडे येथे गेले होते. या ठिकाणी पथकाने सलामी दिली. आजरा येथील गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री सुमारे अकराच्या सुमारास हे पथक वाहनातून गावाकडे परतत होते.
परतीच्या प्रवासात अनिकेत याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. (returning) त्यानंतर पथक गावाकडे परतत असताना वाहनातच अनिकेत याला पुन्हा त्रास जाणवला. त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
अनिकेतची घरची परिस्थिती बेताची असून, त्याचे वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अनिकेत अविवाहित होता. (returning) त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, हनुमान तालीम मंडळातील त्याच्या सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. यावेळी बाळूमामा यांच्यासोबतचा त्याचा शेवटचा फोटो असल्याची माहिती सहकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय दिलं उत्तर?
एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का अधिकारात केली मोठी कपात?
कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलवर,पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले?