बारामती पोटनिवडणुकीत दुपारी एक मोठा ट्विस्ट आला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आपला अर्ज मागे घेत सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा करून दिला. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आम्ही अर्ज मागे घेतोय. मात्र २०२९ ला आमचाच आमदार असेल असं सांगत भविष्यातला मोठा दावा केला. दरम्यान, काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळं आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.