मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस तिसऱ्या स्थानी,शरद पवार यांना टाकलं मागे?

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एका महत्त्वाच्या(political) विक्रमाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कार्यकाळाच्या बाबतीत फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकत राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. 12 जुलै 2026 या तारखेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ 2,430 दिवसांचा सुमारे 6 वर्ष 7 महिने झाला आहे. याच कालावधीसह, फडणवीस यांनी शरद पवार यांच्या 2,412 दिवसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कार्यकाळाला मागे टाकलं आहे. फडणवीस यांचा सध्याचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ सुरू असल्याने त्यांच्या नावावरील हा विक्रम दिवसेंदिवस वाढत आहे.

फडणवीस आत्तापर्यंत 3 वेळा मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्री झाले (political)आहेत. त्यांचा पहिला कार्यकाळ 2014 ते 2019 या कालावधीत सलग पाच वर्षांचा होता. 2019 साली त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; मात्र तो कार्यकाळ अवघ्या सहा दिवसांत संपुष्टात आला. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारली. 12 जुलै 2026 पर्यंत या तिसऱ्या कार्यकाळाला 585 दिवस पूर्ण झाले असून तो अद्याप सुरू आहे.विशेष म्हणजे शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना एकदाही सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

चारही कार्यकाळांचा शेवट विविध राजकीय(political) आणि प्रशासकीय कारणांमुळे मुदतपूर्व झाला होता.मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कालावधीच्या यादीत दिवंगत वसंतराव नाईक हे ४,०९६ दिवसांसह अव्वल स्थानावर आहेत. त्यांच्या पाठोपाठ २,६८६ दिवसांसह विलासराव देशमुख दुसऱ्या स्थानावर आहेत. आता २,४३० दिवसांच्या कार्यकाळासह देवेंद्र फडणवीस तिसऱ्या स्थानावर पोहोचले असून शरद पवार २,४१२ दिवसांसह चौथ्या स्थानावर गेले आहेत.

महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते :
वसंतराव नाईक – ४,०९६ दिवस ११ वर्षे ७८ दिवस
विलासराव देशमुख – २,६८६ दिवस सुमारे ७ वर्षे १२९ दिवस
देवेंद्र फडणवीस – २,४३० दिवस सुमारे ६ वर्षे ७ महिने १२ जुलै २०२६ पर्यंत
शरद पवार – २,४१२ दिवस सुमारे ६ वर्षे २२१ दिवस

या नव्या टप्प्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या(political) कार्यकाळाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला असून त्यांचा विद्यमान कार्यकाळ सुरू असल्याने ही नोंद आगामी काळात आणखी विस्तारण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

बच्चू कडू आक्रमक मंत्र्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव केला सादर?

अशैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर?

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये जगाला दिसली भारताची ताकद : मोदी?