विनायक राऊतांचा सूनेवर पलटवार 13 बॅगा, दागिने आणि पैशांबाबत केला गंभीर दावा?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वाद अधिकच चिघळला आहे. सूनेने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू असतानाच विनायक राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत सूनेवर अनेक गंभीर आरोप केले. घरातून मोठ्या प्रमाणात सामान, दागिने आणि इतर वस्तू घेऊन गेल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तक्रारीनंतर विनायक राऊत यांचे प्रतिउत्तर विनायक राऊत यांनी सूनेने केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना तिच्या तक्रारीतील अनेक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (Vinayak Raut) त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक वेळी आई-वडिलांना सोबत घेऊन जात असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. जर तक्रारीत नमूद केलेले प्रकार खरे असतील, तर त्यावेळी संबंधितांनी तात्काळ पोलिसांकडे धाव का घेतली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गिरीजा राऊत आणि तिच्या वडिलांनी त्या काळात पोलिसांत तक्रार नोंदवली नसल्याचेही त्यांनी नमूद केले.यावेळी त्यांनी आणखी दावा केला की, तक्रारीमध्ये गिरीजा राऊत यांनी स्वतःहून माहेरी गेल्याचे नमूद केले आहे. (Vinayak Raut) तसेच स्त्रीधन सोबत नेल्याचाही उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. घरातून तब्बल 13 बॅगा भरून नेण्यात आल्या असून त्यामध्ये सोनं, चांदी आणि इतर साहित्य असल्याचा आरोप त्यांनी केला. लग्नावेळी किती स्त्रीधन आणले आणि निघताना किती वस्तू सोबत नेल्या, हे धाडस असेल तर स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

घर, कोटींची मागणी आणि गुन्हा दाखल विनायक राऊत यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला दोन बेडरूमचे घर मागण्यात आले होते. त्यानंतर दोन कोटी रुपयांची मागणी पाच कोटींवर गेली आणि आता ती दहा कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. पुढे तीन बेडरूमचे घरही मागण्यात आले, मात्र त्या घराचा ईएमआय आपण भरणार नसून तो त्यांनीच भरावा, अशी भूमिका समोर ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यामुळेच आरोप करण्यात आल्याचा दावा करत आम्ही अशा आरोपांना घाबरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पंढरपूरचा पांडुरंग आणि बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत असून कुलदैवताच्या दर्शनासाठी गावाला जाणे हा कोणताही गुन्हा नसल्याचे त्यांनी म्हटले. (Vinayak Raut) दरम्यान, विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत याच्यावर पत्नी गिरीजा राऊत यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. वैवाहिक आयुष्य आणि शारीरिक संबंधांबाबतही तिने गंभीर दावे केले आहेत. या प्रकरणात विनायक राऊत, गितेश राऊत आणि इतर मिळून एकूण सात जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडीनंतर आता विनायक राऊत यांनीही सूनेविरोधात गंभीर आरोप करत आपली भूमिका सार्वजनिकपणे मांडली आहे.

हेही वाचा :

मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा?

चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट?

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसणार? 15 आमदार फुटणार?