इचलकरंजी, २१ मे २०२५ – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ मे, शुक्रवारी इचलकरंजी येथे विविध विकासयोजनांचा शुभारंभ व लोकार्पण करणार आहे. यावेळी ७०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या योजना(projects) सुरू होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहापूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही होणार आहे.
मुख्य कार्यक्रमांची माहिती:
- सकाळी ११ वाजता: शहापूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन (४ कोटी रुपये खर्च).
- नगरोत्थान अभियान:
- ४८८.६७ कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेचा शुभारंभ.
- ९७ कोटी रुपयांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) चे लोकार्पण.
- ३१ कोटी रुपयांच्या ६ नवीन जलकुंभांच्या बांधकामाची सुरुवात.
- मुख्यमंत्री सडक योजना: ५९ कोटी रुपयांच्या काँक्रिट रस्त्याचे काम (projects)सुरू.
- लोकहिताच्या योजना:
- संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ४,०००+ लाभार्थ्यांना मंजूरीपत्रे वाटप.
- ५,०००+ बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे संच वितरण.
- इंदिरा गांधी रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजच्या बांधकामाचा शुभारंभ.
- ५ कोटी रुपयांच्या पंचगंगा जॅकवेल दाबनलिका बदल प्रकल्पाची सुरुवात.
विकास पर्व सभा:
- के.ए.टी.पी. ग्राउंड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना संबोधित करणार आहे.
- उपस्थिती: उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडीक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपा नेते सुरेश हाळवणकर यांच्यासह इतर मान्यवर.
आवाहन: आमदार राहुल आवाडे यांनी सर्व इचलकरंजीकरांना के.ए.टी.पी. ग्राउंड येथे हजर राहून या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! सरकारचा मोठा निर्णय…
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश; अबुझहमदमध्ये 26 हून अधिक नक्षलवादी ठार
मुख्याध्यापिकेकडून शिक्षक पतीची हत्या, विद्यार्थ्याच्या मदतीने मृतदेह जाळला