मुख्याध्यापिकेकडून शिक्षक पतीची हत्या, विद्यार्थ्याच्या मदतीने मृतदेह जाळला

महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले. येथे मुख्याध्यापिकेने तिच्या शिक्षक पतीला विष देऊन मारल्याची घटना घडली. यानंतर, मंगळवारी (२० मे) रोजी मुख्याध्यापकीने(Principal) शिकण्यासाठी आलेल्या तीन नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या मदतीने तिच्या पतीचा मृतदेह जंगलात नेऊन जाळला. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी मुख्याध्यापिका निधी शंतनू देशमुख (वय २३) यांना अटक केली आहे. चौकशीसाठी तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शंतनू अरविंद देशमुख हे यवतमाळमधील दारव्हा रोडवरील सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी निधी त्याच शाळेची मुख्याध्यापिका(Principal) आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचे आंतरजातीय लग्न झाले होते. काही दिवस आयुष्य चांगले चालले, पण शंतनूला दारूचे व्यसन लागले. यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि निधी तिच्या पतीपासून सुटका मिळवण्याचा विचार करू लागली.

हा विचार मनात ठेवून तिने १३ मे च्या रात्री तिच्या पतीला विष देऊन ठार मारले. त्यानंतर पत्नीने मृतदेह रात्रभर घरातच ठेवला. ती दुसऱ्या दिवशी शाळेत गेली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी घरी शिकवणीसाठी येणाऱ्या नववीच्या तीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गेली आणि त्यांची मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची मदत घेतली.

रात्री विद्यार्थ्यांच्या मदतीने शंतनूचा मृतदेह चौसाळा जंगलात नेण्यात आला आणि तिथे फेकण्यात आला. जेव्हा तिला भीती वाटू लागली की जर मृतदेहाची ओळख पटली तर तिच्या समस्या वाढतील, तेव्हा ती पुन्हा जंगलात गेली आणि तिच्या पतीच्या शरीरावर पेट्रोल ओतून ते पेटवून दिले. यानंतर ती असे वागू लागली जणू काही घडलेच नाही.

यानंतर पोलिसांना एक अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी गुन्ह्याचे गांभीर्य समजून घेत तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने तपास सुरू केला. त्यानंतर शंतनू काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शंतनूच्या मित्रांना बोलावले. तो मृतदेह शंतनूचा असल्याचे स्पष्ट होताच, निधीला चौकशीसाठी बोलावण्यात आले. पोलिसांनी स्केच दाखवल्यावर त्याने आपला गुन्हा कबूल केला.

हेही वाचा :

अखेर छगन भुजबळ आले सत्तेच्या मांडवाखाली…….!

‘माझा नवरा तरुणींना राजकारण्यांसोबत झोपण्यासाठी छळतो,’ कार्यकर्त्याच्या पत्नीची FIR

कोल्हापूर जिल्ह्यात तिघांना कोरोनाची लागण; खासगी रुग्णालयात उपचार सुरू