इंदूर : एका आईने(mother) आपल्या ९ महिन्यांच्या निष्पाप मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीची आई आरोपी वर्षा चौहानने घराच्या अंगणात असलेल्या पाण्याच्या टाकीत बुडवून तिची हत्या केली आणि कोणालाही काही संशय येऊ नये म्हणून टाकीचे झाकण बंद करून त्यावर पाण्याची मोटार ठेवली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह आणि आरोपी आईला ताब्यात घेतले आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर येथे ही घटना घडली आहे. पोलिसांना सुरुवातीला माहिती मिळाली की मुलीचा मृत्यू पाण्याच्या टाकीत पडून झाला. पण जेव्हा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आणि पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला तेव्हा घटनेमागील सत्य समोर आले.
कठोर चौकशीत आईने(Mother) तिचा गुन्हा कबूल केला. एसीपी शिवेंदु जोशी यांच्या माहितीप्रमाणे, आरोपी महिलेचे हे दुसरे लग्न आहे. तिचे वर्तन बऱ्याच काळापासून असामान्य असल्याची माहिती आहे. तपासात असे दिसून आले की ती मानसिक ताण आणि प्रचंड क्रोधाने ग्रस्त होती. आठवड्यापूर्वीही तिने मुलीला सासूने घेण्यास नकार दिल्याने जमिनीवर फेकून दिले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षाचे पहिले लग्न बरोद गावात झाले होते. पहिल्या लग्नापासून तीला अडीच वर्षांची मुलगी आहे. परंतु वर्षाच्या स्मृतिभ्रंश आणि चिडचिडेपणामुळे तीचे पहिले लग्न मोडले. तीचे दुसरे लग्न अविनाश चौहान याच्याशी झाले. जो रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय करतो. परंतु येथेही वर्षाच्या सवयींमुळे सासरच्या लोकांशी असलेल्या नात्यात कटुता आली.
घटनेच्या दिवशी अविनाश बाथरूममध्ये होता. तर मुलगी तिच्या आईच्या(mother) शेजारी बेडवर होती. काही वेळाने वर्षा अचानक मुलगी बेपत्ता असल्याची ओरड करू लागली. तिचा आवाज ऐकून शेजारी आणि कुटुंबातील सदस्यांनी मुलीचा खूप शोध घेतला. त्यानंतर अंगणातील टाकीचे झाकण उघडले असता, मुलीचा मृतदेह त्यात आढळला. सध्या पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे आणि तिच्या मानसिक आरोग्याशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. आईच्या बिघडलेल्या मानसिक अवस्थेमुळे एका निष्पाप मुलीचा जीव गेल्याने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :