अनैतिक संबंधातून जवानाकडून बायकोला विषारी इंजेक्शन

धुळे तालुक्यातील वलवाडी गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. (poison )भारतीय सैन्य दलात असलेल्या कपिल बागुल याने पत्नी शारदा कपिल बागुल हिची निर्घृण हत्या केली. प्रेमसंबंधाला अडसर ठरलेल्या पत्नीला पेस्टिसाइडचं इंजेक्शन देऊन खून करणाऱ्या सैन्य दलातील लिपिकासह प्रेयसी, सासू, सासरे आणि नणंद अशा पाच जणांना पश्चिम देवपूर पोलिसांनी अटक केली. त्याचदरम्यान, इतर चार संशयितांचा अजूनही शोध सुरू आहे. तर पूजाचा पती कपिल आणि संशयित महिला प्रज्ञा यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली. पूजाचे सासू, सासरे व नणंद यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. धुळे न्यायालयानं तसे निर्देश दिले आहेत.

सैन्य दलातील कपिलने कौटुंबिक वादातून पत्नी पूजा यांना पेस्टिसाइडचं इंजेक्शन दिलं. यानंतर सुमारे दोन तासांपेक्षा जास्त वेळ कपिल तिच्या मृत्यूची वाट पाहत होता. शिवाय तिच्या डोक्यावर एका कडक वस्तूने वार करून खून करण्यात आला, (poison )अशी तक्रार मृत पूजाचा भाऊ भूषण महाजन याने दिली. त्यानुसार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कपिल बागुल, त्याचे वडील बाळू बुधा बागुल, आई विजया, बहीण रंजना धनेश माळी, प्रज्ञा कर्डिले यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. सर्व पाच संशयितांना दुपारी धुळे न्यायालयात नेण्यात आलं.

या गुन्ह्यातील कपिल आणि प्रज्ञा यांच्याकडून अजून काही प्रश्नांची उकल करायचं राहिलं आहे. इतर चार संशयित अजून गजाआड झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पश्चिम देवपूर पोलिसांनी केली होती. न्यायालयाने कपिल आणि प्रज्ञा यांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची म्हणजे ७ जूनपर्यंत वाढ केली. (poison )तर कपिलचे वडील बाळू बागुल, आई विजया, बहीण रंजना यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान, पेस्टिसाइड पुरवणाऱ्या आणि इतर तीन जणांचा पोलीस शोध घेत आहे. त्यासाठी पथक रवाना केलं आहे. जळगाव, नाशिक आणइ नंदुरबार येथील पोलिसांना देखील संशयितांची माहिती देण्यात आली आहे. चारही संशयितांना लवकर अटक व्हावी. हत्येचा गुंता सुटावा यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा :