भारत-इंग्लंड वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर जाणून घ्या सामने कधी सुरू होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 14 जुलैपासून सुरुवात होत आहे. टी-20 मालिकेनंतर आता दोन्ही संघ वनडे क्रिकेटमध्ये आमनेसामने येणार असून, (teams) या मालिकेतील प्रत्येक सामना वेगवेगळ्या वेळेला खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या पुनरागमनामुळे या मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.

वनडे मालिकेचे वेळापत्रक आणि सामन्यांच्या वेळा भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 14, 16 आणि 19 जुलै रोजी रंगणार आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर या मालिकेला प्रारंभ होईल. यापूर्वी झालेल्या टी-20 मालिकेत इंग्लंडने 4-0 असा विजय मिळवला होता. त्यामुळे आता वनडे मालिकेत दमदार कामगिरी करून पराभवाची भरपाई करण्याची संधी भारतीय संघाकडे असेल. (teams) याशिवाय 2027 च्या विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनेही ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. ही मालिका बर्मिंगहॅम , कार्डिफ आणि लॉर्ड्स या मैदानांवर खेळवली जाणार आहे. भारताने मागील इंग्लंड दौऱ्यात लॉर्ड्सवर वनडे सामना खेळला होता. सात वर्षांनंतर भारतीय संघ बर्मिंगहॅममध्ये वनडे खेळणार असून, कार्डिफमध्ये तब्बल 12 वर्षांनंतर एकदिवसीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. मालिकेतील पहिला आणि तिसरा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल, तर कार्डिफ येथे होणारा दुसरा सामना सायंकाळी 5.30 वाजता खेळवला जाणार आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू सज्ज या मालिकेत शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून, रोहित शर्मा , विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे अनुभवी खेळाडू पुन्हा एकदा एकत्र मैदानात दिसणार आहेत. श्रेयस अय्यर उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार असून, केएल राहुल आणि इशान किशन यांच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल. (teams) तसेच वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार आणि प्रिन्स यादव यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे इंग्लंड संघाचे नेतृत्व हॅरी ब्रूक करणार आहे. संघात टॉम बँटन, जोस बटलर, बेन डकेट, जो रूट, जेकब बेथेल, जेम्स कोल्स, सॅम करन, लियाम डॉसन, विल जॅक्स, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद, जोश टंग आणि साकिब महमूद यांचा समावेश आहे. दोन्ही संघांमध्ये अनेक अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल असल्याने ही मालिका रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा?

चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट?

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसणार? 15 आमदार फुटणार?