पोलिसांचा आवाज दणाणला, सराईत गुंडांचा माज उतरला?

गळ्यात चकाकणारा गोफ, हातात किमती घड्याळ, डोळ्यावर भारी गॉगल अन्‌ दिमतीला आलिशान मोटार, सोबतीला हातावर टॅटू ओढलेली चार टवाळकी पोरं! धंदा काय तर भाईगिरी, खंडणी वसुली आणि खासगी सावकारी किंवा खुनांसह गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड… गोरगरिबांवर गुरगुरणाऱ्या, दहशत निर्माण करणार्‍या टोळ्यांच्या म्होरक्यासह नामचीन गुंड पोलिस अधिकाऱ्यांसमोर हात जोडून उभे होते. (glittering) सामान्यांना खूनसी नजरेने धाकात ठेवणाऱ्या गुन्हेगारांच्या माना खाली गेल्या होत्या. पोलिस ॲक्शन मोडवर आल्यानंतर काय अवस्था होते, याचा प्रत्यय शनिवारी आला.

पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी शहरातील चारही ठाण्यांतर्गत गुंडांची हिटलिस्ट केली. कोणावर पाच-दहा, तर कोणावर पंधरा-वीस गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड, कोणी खंडणीखोर, संघटित टोळ्यांचा म्होरक्या, तर कोणी शस्त्र, बनावट दारू, अमली तस्कर. लक्ष्मीपुरी ५६, शाहूपुरी ५३, जुना राजवाडा २४, तर राजारामपुरीतील ३० गुंड अशा १६३ गुंडांना शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजेरीचे निरोप धाडण्यात आले.भरचौकात ‘मेरी आवाज सुनो’चे फटकारे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या कठोर कारवाईच्या आदेशामुळे ‘ॲक्शन मोड’वर आलेल्या प्रभारी अधिकाऱ्यांनीही मुलाहिजा न ठेवता गुंडांना सज्जड इशारा दिल्याने पोलिस ठाण्याचा आवार गुंडांच्या गर्दीने खचाखच भरले होते. नाव पुकारले की, गुन्हेगारांच्या कारनाम्यांची माहिती दिली जात होती. (glittering) त्यात ‘रिल्स’च्या माध्यमातून मिजास ठोकणाऱ्या गुंडांचाही समावेश होता. पोलिसांना ‘हलक्या’त घेणाऱ्या काही म्होरक्यासह टवाळखोरांना ‘मेरी आवाज सुनो’चा प्रसादही मिळाला.

झाडाझडती एवढ्यावरच थांबणार नाही. अफू, चरससह गांजा ओढून नशेत दहशत माजविणाऱ्या गुंडांसह खंडणीखोर, सावकार, सोशल मीडियाद्वारे समाजात द्वेश पसरविणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल झाल्यास त्यांची शहरातील गल्ली, बोळातून ‘वरात’ काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. (glittering) संघटित गुंडागर्दी करणाऱ्यांवर मोका कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारण्याचाही इशारा देण्यात आला आहे. गुन्हेगारीचा समूळ नायनाट करण्यासाठी पोलिसांचे कारवाईत सातत्य हवे, अशीही कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा?

चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट?

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसणार? 15 आमदार फुटणार?