शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आणि नीट परीक्षेतील कथित अनियमिततेच्या चौकशीच्या मागणीसाठी जंतर मंतर येथे अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे. गुरुवारी त्यांच्या उपोषणाचा १९वा दिवस होता.सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या प्रकृतीसंदर्भातील याचिकेवर सुनावणी सरकारी रुग्णालयात डॉक्टरांकडून नियमित तपासणी करण्याचे निर्देश शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आणि नीट परीक्षेतील कथित अनियमिततेसाठी जंतर-मंतर वर उपोषण

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या प्रकृतीसंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना, दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने सोनम वांगचुक यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर (PIL) सुनावणी घेतली. यावेळी न्यायालयाने “सोनम वांगचुक यांचे जीवन अनमोल आहे. (Education) त्यांची सरकारी रुग्णालयात डॉक्टरांकडून नियमित तपासणी केली जावी. त्यांच्या आरोग्यावर दररोज लक्ष ठेवले जावे आणि प्रकृती खालावल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तात्काळ योग्य वैद्यकीय उपाययोजना केल्या जाव्यात”असे निर्देश दिले आहेत.
‘मी मरणार नाही..’; व्हिडीओ जारी करत यांचे देशाला आवाहन सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने, “सोनम वांगचुक यांची नियमित आरोग्य तपासणी होत आहे का,’ असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला. सॉलिसिटर जनरल (SG) यांनी न्यायालयाला माहिती दिली की, वांगचुक यांनी संमती दिल्यापासून त्यांची नियमित आरोग्य तपासणी होत असल्याचे सांगितले. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली. ही जनहित याचिका वकील राकेश कुमार सैनी यांनी दाखल केली होती.
या याचिकेची मागणी काय होती बुधवारी, याचिकाकर्ते आणि वकील राकेश कुमार सैनी यांनी न्यायालयाला सांगितले की, आपल्या मूलभूत हक्कांचा वापर करून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या एका मानवाधिकार कार्यकर्त्याला अशा वागणुकीला सामोरे जावे लागत आहे, ही एक अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी परिस्थिती आहे. ते संपूर्ण राष्ट्रासमोर आपल्या प्राणांचे बलिदान देण्याच्या तयारीत आहेत, (Education) असेच दिसत आहे.” याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, दिल्ली उच्च न्यायालयाने खटला ऐकण्यास सहमती दर्शवली आणि केंद्र सरकार तसेच दिल्ली सरकारकडून प्रतिसाद मागवला.
आज वांगचुक यांच्या उपोषणाचा १९वा दिवस शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आणि नीट परीक्षेतील कथित अनियमिततेच्या चौकशीच्या मागणीसाठी जंतर मंतर येथे अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे. गुरुवारी त्यांच्या उपोषणाचा १९वा दिवस होता.काल रात्री उशिरा प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ संदेशात, ५९ वर्षीय वांगचुक म्हणाले, “नमस्कार मित्रांनो, खूप मुश्लिकीलीने माझ्या उपोषणाच्या १८ व्या दिवशी मी तुमच्याशी जेमतेम संपर्क साधू शकत आहे. मला तुमच्याकडून हजारो संदेश येत आहेत, ज्यात तुम्ही मला उपोषण सोडून काहीतरी खाण्यास सांगत आहात. ज्येष्ठ आणि नेते आपले मत मांडत आहेत. काही जण प्रेमाने बोलत आहेत, काही जण रागाने, आणि काहींनी तर सरकारला मला खाण्यास भाग पाडण्यासाठी न्यायालयात अपील केले आहे.”
उपोषण न सोडण्याची मुख्य कारणे त्यांनी उपोषण न सोडण्यामागे दोन मुख्य कारणे सांगितली. तो म्हणाला, “दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, मी खाल्लं तरी त्यातून काय संदेश जाईल? सरकारला हा संदेश जाईल की, उत्तरदायित्वाची काही गरज राहिली नाही. ते फक्त येतात, बसतात आणि निघून जातात. दुसरी गोष्ट म्हणजे, माझी प्रकृती अशी नाही की मी दोन-चार दिवसांत मरेन. माझ्या अनेक वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. १८ दिवसांच्या उपवासानंतर माझी प्रकृती सामान्य आहे. (Education) आज माझा ईसीजीसुद्धा झाला. वैद्यकीय अहवाल फारसा वाईट नाही, त्यामुळे मी काही दिवस चालू शकेन. मी अशक्त आहे, माझे स्नायू साथ देत नाहीत, पण माझे हृदय अजूनही काम करत आहे.
हेही वाचा :
पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?