मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र पाटील यांच्या मागणीची दखल घेतली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख यांची बदली करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्यात वाद असल्याचे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वी नरेंद्र पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते. संचालकांनी महामंडळाचा कारभार संथ ठेवल्याचा आरोप केला होता. पोर्टल बंद ठेवल्याचाही आरोप नरेंद्र पाटलांनी केला होता. त्यामुळे नरेंद्र पाटील यांनी विजयसिंह देशमुख यांच्या बदलीची मागणी केली होती. (Devendra Fadnavis) त्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र पाटील यांच्या मागणीची दखल घेतली आहे. अखेर आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख यांची बदली झाली आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि एमडी विजयसिंह देशमुख यांच्या वादाची राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख हे मराठाद्वेषी अधिकारी असल्याची टीका नरेंद्र पाटील यांनी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज नरेंद्र पाटील यांच्या मागणीची दखल घेतली. त्यानंतर आता देशमुखांच्या जागी अविनाश रणखांब (Devendra Fadnavis) यांची एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एमडी देशमुख यांच्या विरोधात मराठा समाजातील उद्योजकांची देखील नाराजी होती. त्यांचीही दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नुकताच पाच जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला होता. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मंजूर झालेल्या तरुणांचे एलवाय अचानक रद्द केल्याने त्यांच्या विरोधात मोठी नाराजी होती.
मराठा समाजातील तरुण उद्योजकांच्या तक्रारीनंतर नरेंद्र पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान नरेंद्र पाटील यांनी मंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख यांची तक्रार केली होती. नरेंद्र पाटलांवर अधिकारी विजयसिंह यांच्यावर जहरी टीका केली होती. विजयसिंह देशमुख हे ‘मराठाद्वेषी अधिकारी’ असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या कारभाराचा फटका हा मराठा समाजातील तरुण उद्योजकांचं मोठे नुकसान होत असल्याचा दावा केला होता. (Devendra Fadnavis) त्यानंतर नरेंद्र पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या सर्व परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला होता.
हेही वाचा :
कोल्हापुरात लिंगायत समाजाचा एल्गार?