एका ऑलिंपिक वीराची ………..परवड काही थांबत नाही!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

हेलसिंकी येथे संपन्न झालेल्या (hero’s)ऑलिंपिक स्पर्धेत व्यक्तिगत गटातील कुस्ती स्पर्धेत कास्य पदक पटकावणारे पैसलवान खाशाबा जाधव यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू आहे आणि भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले ती अलौकिक घटना अमृत महोत्सवी वर्षात पुढील वर्षी पदार्पण करेल. पण या ऑलिम्पिक वीराला भारत सरकारने न्याय दिला आहे असे दुर्दैवाने घडलेले नाही. आणिमरणोत्तर सन्मानासाठी त्यांच्या कुटुंबीयांना न्यायालयात दाद मागावी लागते यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

सातारा जिल्ह्यातील कराड (hero’s)तालुक्याच्या गोळेश्वर या गावात दिनांक 15 जानेवारी 1926 रोजी खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्म झाला. वयाच्या 26 व्या वर्षी अर्थात इसवी सन 1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये बॅटन वेट गटात कुस्तीमध्ये त्यांनी कास्य पदक पटकावले होते. भारत देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव होते.

त्यानंतर ऑलिंपिक स्पर्धेत (hero’s)पदक मिळविण्याचे खाते उघडायला भारताला 44 वर्षे लागली. क्रीडा क्षेत्रात इतका मोठा पराक्रम करूनही, भारत सरकारने तसेच महाराष्ट्र सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. शिवछत्रपती पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार हे दोन पुरस्कार त्यांना मरणोत्तर मिळाले. योगेश्वर दत्त या पैलवान आम्ही लंडनमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत कुस्ती या व्यक्तिगत गटात कास्य पदक पटकावल्यानंतर त्याला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. योगेश्वर दत्त याला जो न्याय मिळाला तोच न्याय खाशाबा जाधव यांना अद्यापही का मिळत नाही?

महाराष्ट्र सरकारने खाशाबा (hero’s)जाधव यांच्या पद्म पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे शिफारस का केली नाही? एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कराड येथे खाशाबा जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. तेव्हा खाशाबांचे सुपुत्र रणजीत जाधव यांनी आमच्या वडिलांना मरणोत्तर पद्मभूषण किंवा तत्सम पुरस्कार मिळाला पाहिजे अशी त्यांच्याकडे मागणी केली होती. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली होती मात्र या घोषणेची अद्याप अंमलबजावणी झालेली दिसत नाही.

ऑलिंपिक मध्ये विविध क्रीडा (hero’s)प्रकारात पदक पटकावणाऱ्या क्रीडापटूंना पद्म पुरस्काराने सन्मानित केले जाते. भारताला पहिले कास्यपदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण, किंवा पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे या मागणीसाठी त्यांचे पुत्र रणजीत जाधव यांनी कोल्हापूरच्या उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कडे धाव घेतली आहे.