गृहमंत्री अमित शहांच्या ताफ्यात केवळ सहाच वाहने?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी (दि. १९) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलिस प्रशासनाने अमित शहा यांच्या ताफ्यातील वाहनांची रंगीत तालीम घेतली. या ताफ्यामध्ये केवळ सहाच वाहने असल्याचे दिसून आले. (Kolhapur) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानास प्रतिसाद देत गृहमंत्री, मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केल्याचे रंगीत तालमीतून दिसून आले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी ५ वाजता शहा यांच्या ताफ्यातील वाहनांची रंगीत तालीम घेतली. विमानतळ ते शासकीय विश्रामगृह येथे ताफा पोहोचण्यासाठी केवळ सहा मिनिटांचा अवधी लागला. येथून करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर, पोलिस कवायत मैदान आणि इचलकरंजी सभास्थळ या मार्गावरही रंगीत तालीम घेण्यात आली. (Kolhapur) यावेळी ताफ्याच्या मार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, ठिकठिकाणी वाहतूकही थांबविण्यात आली होती.

वाहनांची संख्या केली कमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्यामध्ये केवळ सहा वाहनांचाच समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आहे. (Kolhapur) गुरुवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या रंगीत तालमीदरम्यान संपूर्ण ताफ्यात केवळ १० वाहनांचा समावेश करण्यात आला होता.

हेही वाचा :

फुटीचा शाप असलेली शिवसेना!

विधान परिषदेसाठी आज होणार मतदान?

SBI मध्ये पदवीधरांसाठी बंपर भरती जाणून अर्ज प्रक्रिया?