कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ऊसतोडणीचा हंगाम सुरू असून शेतकरी आणि ऊसतोड मजुरांसमोर एक नवे संकट उभे राहिले आहे. खोची-दुधगाव परिसरात मगरींचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Kolhapur) दिवसा शेतात आणि रात्री थेट रस्त्यावर महाकाय मगर दिसत असल्याने शेतकरी, महिला मजूर आणि वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खोची-दुधगाव रस्त्यावरील पुलाजवळ दररोज महाकाय मगरीचे दर्शन होत असल्याचे शेतकरी आणि प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. रस्त्यावर मगर आल्याचे दिसताच वाहनचालकांना आपली वाहने थांबवावी लागत आहेत. मगर रस्त्यावरून बाजूला जाईपर्यंत प्रवाशांना पुढे जाता येत नाही. (Kolhapur) त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.सध्या ऊसतोडणीचा हंगाम सुरू असल्याने रात्रीच्या वेळी ऊसतोड मजुरांची या परिसरात मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. अशातच अंधारात अचानक मगरीचा सामना झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी आणि मजूर जीव मुठीत धरून शेतीची कामे करत आहेत.
मगरीच्या भीतीमुळे महिला शेतमजूर आणि काही शेतकरी शेतात जाणेही टाळत असल्याचे सांगितले जात आहे. (Kolhapur) याचा परिणाम शेतीच्या कामांवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः ऊसतोडणीच्या हंगामात मजुरांना रात्रीच्या वेळी कामासाठी बाहेर पडणे धोकादायक वाटत आहे.एखादी जीवघेणी दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने या मगरीच्या वावराची तातडीने दखल घ्यावी आणि आवश्यक ती सुरक्षित उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मगरीला सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी वनविभाग कधी पावले उचलणार आणि खोची-दुधगाव परिसरातील नागरिकांना या दहशतीतून कधी दिलासा मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख