राज्याला मिळणार नवा अर्थमंत्री शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची वर्णी लागणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्याकडे राज्याचे अर्थ खाते सोपवले जाऊ शकते, (Nationalist) अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, यासंदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना उधाण गेल्या दहा दिवसांपासून राज्यातील विविध नेत्यांच्या भेटींमुळे नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना वेग आला आहे. जयंत पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे यांची झालेली भेट, (Nationalist) त्यानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा, तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठका यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या घडामोडींनंतर जयंत पाटील यांच्यासाठी अर्थमंत्रीपदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.

या सर्व राजकीय हालचालींमुळे राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून,(Nationalist) त्याचबरोबर काही महत्त्वाच्या विधेयकांबाबतही राजकीय समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींना महाविकास आघाडीसाठी राजकीय धक्का मानले जात असले, तरी याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका संबंधित पक्षांकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

मुंबई येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट झाल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. या भेटीला जयंत पाटील यांनीही दुजोरा दिला होता. त्यानंतर ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या प्रकरणासंदर्भात ते वर्षा निवासस्थानी गेले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही तेथे उपस्थित असल्याची चर्चा झाली होती. यानंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. तसेच अर्थ खाते राष्ट्रवादीकडे दिल्यास निधी वाटपात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भूमिका यापूर्वी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या भेटीनंतर तो तिढा सुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा :

पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?

कोल्हापूरच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा?

अन्न व औषध प्रशासनाचा धाडींचा सपाटा?