कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
राजकारणात व्यक्त होताना, बोली भाषेत संवाद साधताना, भाषा सभ्यता बाळगली पाहिजे.कारण ते आपल्या संस्कृतीशी सुसंगत आहे. तथापि असभ्य भाषा बोलणे, शिवीगाळ करणे हे नैतिकतेच्या चौकटीत बसत नसले तरी तो गुन्ह्याचा प्रकार होत नाही.असे खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच एक याचिका निकालात काढताना म्हटले आहे. (language) त्यामुळे आता शिवीगाळ करणे हा अदखलपात्र गुन्हा सुद्धा ठरणार नाही.भांडणात अर्वाच्य शिवीगाळ केली, असभ्य भाषा वापरली म्हणून एका संशयीताला कनिष्ठ न्यायालयाने दंडात्मक तसेच सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती.

हे प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट झाले. त्याचा निकाल देताना शिवीगाळ किंवा सभ्य भाषा हा गुन्हा ठरत नाही असे मत व्यक्त करून संबंधिताची शिक्षा रद्द केली आहे मात्र मारहाण बद्दलची शिक्षा कायम ठेवली आहे. परिणामी असभ्य भाषा किंवा शिवराळ भाषा ही सहज घडून गेलेली अभिव्यक्ती मानली गेली आहे. (language) याचा अर्थ भाषा सभ्यतेला फाट्यावर मारणे असे नाही. शिवराळ भाषा केली जाऊ नये, भाषा सभ्यता पाळून प्रत्येकाने व्यक्त झाले पाहिजे हे आपल्या भारतीय संस्कृतीशी निगडित आहे.
फक्त कायद्याच्या भाषेत तो गुन्हा ठरत नाही इतकेच.भारतीय संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. ते सभ्यतेच्या चौकटीतच वापरले गेले पाहिजे. कारण गंभीर गुन्ह्याची सुरुवात ही अर्वाच्य शिवीगाळीपासून होते. एखाद्याला शिवीगाळ केली, तरच तो संतापने स्वाभाविक आहे आणि मग त्यातूनच पुढे हाणामारीचे प्रकार घडतात. किंवा अगदी गंभीर गुन्हे सुद्धा घडतात. आणि म्हणूनच भाषा सभ्यता जपली पाहिजे. जिभेवर साखर ठेवून बोलले पाहिजे असे आपल्याकडे म्हटले जाते. त्यामुळे विसंवाद घडत नाही. परस्परांचा सन्मान राखला जातो. तथापि बोलण्याचा टोन कोणता आहे यावर शिवीगाळीची तीव्रता मोजली जाते. एखाद्या ठिकाणी रांगडी संस्कृती असेल तर तिथे दिल्या जाणाऱ्या शिवीकडे अगदी सहजपणे दुर्लक्ष केले जाते. आता कोल्हापूरचे उदाहरण द्यायचे असेल तर इथे एखाद्याला शिवी देऊन हाक मारणे, हे समोरच्याबद्दल आपुलकी व्यक्त करणारे ठरत असते. आणि म्हणूनच इथे दिलेली शिवी कुणीही मनावर घेत नाही. कारण समोरच्याला संताप यावा या हेतूने शिवी देऊन हाक मारलेली नसते.
शिवी दिलेला नाही किंवा देणारही नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. महापालिकेच्या रस्त्यावरून, खड्डे चुकवत जाणारा आणि हमखास दुचाकीचे चाक खड्ड्यात गेल्यानंतर मनातल्या मनात महापालिकेचा उद्धार करणारा माणूस असतोच असतो. सहनशीलता संपल्यानंतर ओठात शिवी येतेच. तर एकूणच शिवी देणे हा आपल्या रांगड्या संस्कृतीचाच एक भाग आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही.राजकारणामध्ये भाषा सभ्यता पाळणारे फार कमी राजकारणी आहेत. असंसदीय भाषा बोलणारेच जास्त आहेत. शिवीगाळ करण्यात आणि असभ्य भाषा बोलण्यात उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचा हात कोणी धरू शकत नाही. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा नंबर लागतो. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे सुद्धा अतिशय शिवराळ आहेत.
भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दानवे यांची बोलताना अनेकदा जीभ घसरते. राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा अधून मधून भाषा सभ्यता सोडतात. याशिवाय आमदार भास्कर जाधव, माजी आमदार अमोल मिटकरी, प्रकाश आंबेडकर रवींद्र धंगेकर, गिरीश महाजन, एकनाथ खडसे, (language) यांची सुद्धा यापूर्वी अनेकदा बोलताना जीभ घसरली आहे. मुंबईच्या माजी महापौर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर या सुद्धा असभ्य भाषेचे अनेकदा समर्थन करताना दिसतात. खासदार मोहिते पाटील हे तर अनेकदा पाय तोडून टाकीन, हात तोडून टाकीन अशी धमकीची भाषा बोलतात. महाराष्ट्राच्या राजकारणात असे काही राजकारणी आहेत की त्यांनी कधीही शिवराळ भाषा केलेली नाही. भाषा सभ्यता सोडलेली नाही.
एखाद्याला अर्वाच्या शिवीगाळ करणे हा अदखलपात्र गुन्ह्याचा एक भाग समजला जात असे. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिवीगाळ हा गुन्हा समजला जाणार नाही. असे असले तरी समोरच्याला राग यावा, संताप यावा या उद्देशाने शिवीगाळ करणे संस्कृतीला धरून होत नाही. म्हणूनच संस्कृतीलाच प्राधान्य दिले पाहिजे. शिवी दिली म्हणून संतप्त होऊन खुनासारख्या घटना घडलेल्या आहेत. म्हणूनच साधी शिवी ही एखादी कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच जिभेवर मध ठेवा!
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?