आज सोमवार, २० जुलै २०२६ रोजी आषाढ शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. आज रवी योग, शिव योग आणि सिद्ध योग यांचा शुभ संयोग असून हस्त आणि चित्रा नक्षत्रांचा प्रभाव राहणार आहे. काही राशींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि कौटुंबिक आनंद मिळण्याची शक्यता आहे, (combination) तर काही राशींनी आरोग्य, खर्च आणि निर्णय घेताना विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी सोमवारचा दिवस कसा असेल.

मेष
आज आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. करिअरबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आत्मविश्वास टिकवून ठेवा, अन्यथा चुकीचे निर्णय होऊ शकतात. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल.
वृषभ
दीर्घकाळापासून सुरू असलेला कौटुंबिक वाद मिटू शकतो. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. मात्र अहंकार टाळा.
मिथुन
कामाची गती आणि कार्यक्षमता वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना प्रयत्न वाढवावे लागतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मालमत्ता किंवा जमिनीसंदर्भात गुंतवणुकीचा विचार करू शकता.
कर्क
निर्णय घेताना संभ्रम जाणवू शकतो. घाई न करता शांतपणे विचार करूनच पुढे जा. वाहन खरेदीचा विचार प्रत्यक्षात येऊ शकतो. मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील.
सिंह
नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आहाराची काळजी घ्या, अन्यथा पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. कामावर लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल. वैयक्तिक आयुष्यात आनंददायी घडामोडी होतील.
कन्या
वेळचा योग्य वापर करा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक पावले उचला. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
तूळ
आज आर्थिक लाभाचे योग आहेत. (combination) सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास नवीन संधी मिळतील. कामाप्रती समर्पण ठेवा. मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते.
वृश्चिक
कौटुंबिक निर्णय घेताना घाई करू नका. धोकादायक कामे आणि वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाची आखणी होऊ शकते.
धनु
जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक प्रश्न सामंजस्याने सोडवा. राजकीय किंवा सामाजिक वादांपासून दूर राहा. अनावश्यक प्रवास टाळणे हिताचे ठरेल.
मकर
मुलांच्या गरजा पूर्ण करताना योग्य मर्यादा ठेवा. मालमत्तेशी संबंधित कामांत लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या आणि निर्णयक्षमता वाढवण्यावर भर द्या.
कुंभ
इतरांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवा. वडिलांशी असलेले मतभेद दूर होऊ शकतात. (combination) नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पाहा.
मीन
आज एखादी आनंददायी किंवा अनपेक्षित बातमी मिळू शकते. नोकरीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. बोलताना संयम बाळगा. गुलाबी रंगाचा वापर शुभ ठरू शकतो आणि आत्मविश्वास वाढवू शकतो.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?