फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना विशेष सवलत दिली आहे. फुटबॉलप्रेमींना सामना पाहण्याची सुविधा मिळावी (Hotels) यासाठी 19 जुलैच्या रात्री संबंधित आस्थापना पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून, त्यासाठी काही महत्त्वाच्या अटीही लागू करण्यात आल्या आहेत.

फुटबॉल चाहत्यांसाठी सरकारचा विशेष निर्णय फिफा विश्वचषक 2026 चा अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात न्यूयॉर्क येथे खेळवला जाणार असून, भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 12.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्याला देशभरातील फुटबॉल चाहत्यांचा मोठा प्रतिसाद अपेक्षित असल्याने राज्य सरकारने हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे.राष्ट्रीय रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई यांनी 19 जुलै 2026 रोजी राज्य सरकारकडे खाद्यगृहे, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पहाटेपर्यंत सुरू ठेवण्याची विनंती केली होती. या मागणीचा विचार करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 33 अंतर्गत राज्य सरकारने 20 जुलैच्या पहाटे 4 वाजेपर्यंत संबंधित आस्थापना सुरू ठेवण्यास विशेष परवानगी दिली आहे.
परवानगीसोबत सरकारने घातल्या महत्त्वाच्या अटी राज्य सरकारने दिलेली ही सवलत काही अटींसह लागू करण्यात आली आहे. प्रत्येक आस्थापनाने परिसरात पुरेशा प्रमाणात खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त करणे आवश्यक राहील.(Hotels) तसेच हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या आत किंवा बाहेर कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची जबाबदारी संबंधित आस्थापनाधारकावर असेल. कोणताही अनुचित प्रकार किंवा गुन्हा घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारीही संबंधित परवानाधारकावर निश्चित करण्यात आली आहे.
वाढीव वेळेची परवानगी केवळ बंदिस्त जागेत किंवा इमारतीतील आस्थापनांसाठीच लागू राहणार आहे. ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक यंत्रणांच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. (Hotels) तसेच ध्वनीप्रदूषणासंदर्भातील सर्व नियम लागू राहतील. सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा विचार करून आवश्यक वाटल्यास स्थानिक पोलीस प्रशासनाला ही वाढीव वेळ नाकारण्याचा अधिकारही देण्यात आला असून, राज्यभरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?