कार्यकर्त्याच्या घरावर गुंडाचा हल्ला, घरासमोरची कारच फोडली परभणीत दहशत?

परभणीतील सामाजिक कार्यकर्ते गणपत भिसे यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला करत कारची तोडफोड केली आहे. भिसे यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या घटनेमुळे रामनगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपवर्गीकरण समितीत सक्रिय सहभाग असल्याने हा हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अनुसूचित जाती उपवर्गीकरण समितीत सक्रिय सहभाग असणाऱ्या गणपत भिसे यांच्या घरासमोर हल्ला करण्यता आला आहे. भिसे यांच्या घरासमोरच्या कारची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. (Parbhani) त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या हल्ल्याने भिसे कुटुंबीयही भयभीत झाले आहेत. हा हल्ला करणाऱ्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी भिसे कुटुंबीयांनी केली आहे. तसेच या घटना पुन्हा घडू नये म्हणून खबरदारी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. मात्र, या घटनेमुळे परभणीच्या रामनगरमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

परभणी शहरातील रामनगर परिसरात ही घटना घडली आहे. रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास भिसे हे जेवण करून आपल्या घरात विश्रांती घेत होते. (Parbhani) त्याचवेळी 12.30च्या सुमारास बाहेर आरडाओरड होत असल्याचं ऐकायला आलं. शिवीगाळ होत असल्याचंही ऐकायला आल्याने भिसे घराबाहेर पडले. यावेळी कुटुंबीयांनी भिसे यांना रोखलं. मात्र, आरोपींनी कारची तोडफोड करून घटनास्थळावरून पोबारा केला होता. या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे. गाडीची तोडफोड करतानाची घटना या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर अज्ञात दोन व्यक्ती विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी गणपत भिसे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

या हल्ल्यात भिसे यांचं एक लाख रूपयांचे नुकसान झालं आहे. आरोपींनी शिवीगाळ करत आणि जीवे मारण्याची धमकी देत हा हल्ला केला. पोलीस तक्रारीत तसं नमूद करण्यात आलं आहे. (Parbhani) तसेच हा हल्ला का झाला? हे समोर आलं नाही. मात्र, भिसे यांनी उपवर्गीकरणाच्या आंदोलनात सहभाग घेतला होता म्हणून तर त्यांच्या घरासमोर हल्ला करण्यात आला नाही ना? याचाही तपास पोलीस करत आहेत.सीसीटीव्हीत या हल्ल्याचे चि६ दिसत आहे. एक व्हाईट कार भिसे यांच्या घराबाहेर उभी आहे. दोन लोक या कारच्या काचेवर जड वस्तू फेकून मारताना दिसत आहे. अनेकवेळा ही व्सतू कारवर आपटल्याने कारचे काच फुटल्याचं दिसत आहे. एक व्यक्ती टीशर्टमध्ये आहे. काच फोडल्यानंतर हे दोघेहीजण घटनास्थळावरून निघून जाताना दिसत आहेत. दोघांनी तोंडाला मास्क लावलेला नाहीये. पोलीस आता हे सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींवर कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?