भाजी खरेदीसाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाची पैशांच्या वादातून धारधार शस्त्रानं हत्या

नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढत चालल्याचं दिसून येत आहे. आता पुन्हा एक नाशिकमध्ये हत्या(crime) झाल्याचं समोर आला आहे. १९ वर्षीय मुलाची हत्या झाल्याचं समोर आला आहे. युवक आपल्या वडिलांसोबत भाजीपाला आणायला गेला होता. पैश्याच्या किरकोळ वादावरून या मुलाची धारधार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

पंचवटी पोलीस ठाण्याचा हद्दीत गाडगे महाराज पुलाजवळ बुधवारच्या आठवडे बाजारात आपल्या वडिलांसोबत १९ वर्षीय युवक भाजीपाला आणायला गेला होता. आपल्या वडिलांसोबत गाडगे महाराज पुलासमोरून सायंकाळच्या सुमारास जात असतांना, त्याचा एका अज्ञात व्यक्तीसोबत किरकोळ पैशांच्या वादावरून वाद झाला. या वादानंतर अज्ञात व्यक्तीने अचानक धारदार हत्याराने युवकावर हल्ला करून तेथून पळ काढला. मृतकाचे नाव नंदलाल उर्फ सूरज जगतकुमार दास परदेशी (वय १९, रा. सीतागुंफा रोड, पंचवटी) असे आहे.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमी नंदलालला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शिरोळ तालुक्यातील तमदलगे गावच्या हद्दीत असलेल्या बसवान खिंड या निर्जन डोंगराळ भागात २७ मे रोजी एका युवकाचा मृतदेह(crime) आढळून आला होता. या खुनाच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आली असून, हा खून कोणत्याही परक्याने नाही, तर सख्ख्या भावानेच सुपारी देऊन करवून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील (रा. निमशिरगाव) असं मृतकाचे नाव आहे. त्याच्या सक्ख्या भावानेच सहा लाख रुपये सुपारी देवून खून करवून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

अविनाश हा रोज दारू पिऊन घरी येत असे आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करत असे. त्याच्या या वागणुकीला कंटाळून त्याचा सख्खा भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील याने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने मित्र मोहन प्रकाश पाटील याच्या मदतीने राकेश उर्फ विनोद वसंत थोरात (रा. दानोळी) याला खून करण्यासाठी सुपारी दिली.

हेही वाचा :

नागरिकांनो सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

कोल्हापुरात सख्ख्या भावाच्या खुनामागे सहा लाखांची सुपारी; निर्जन डोंगरात घडलेल्या खुनाचा उलगडा

फडणवीसांचं उत्तर अन् स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दादा अन् शिंदेंचा होणार गेम?