भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ?

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला असताना मोठे संकट उभे आहे. ज्याचा थेट फटका भारताला बसत आहे. भारतात महागाई वाढण्याची शक्यता आहे. जर हे युद्ध अधिक काळ चालले तर भारतासह अन्य देश अडचणीत येऊ शकतात.

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यामध्येच होर्मुज खाडी बंद करण्यात आली. आता यानंतर मोठा दणका भारतासह चीनला बसला. होर्मुज खाडीनंतर दुसरा महत्वाचा जागतिक सागरी मार्गही ठप्प झाला. (affecting) ज्यामुळे तणाव अधिक वाढला असून मोठे संकट उभे आहे. येमेनमधील इराणसमर्थक हूती बंडखोरांनी भारत आणि चीनच्या दिशेने येणाऱ्या तेलवाहू जहाजांना मोठी धमकी दिली. ज्यामुळे या जहाजांना अर्ध्या रस्त्यातूनच माघारी परतावे लागले. या युद्धात आता दुसरे एक मोठे संकट उभे आहे. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे खंडीत होण्याची भीती आहे. भारतासह अन्य देशांना या युद्धाचा मोठा फटका बसताना दिसतोय. जर स्थिती अशीच राहिली तर भारतामध्ये महागाईचा मोठा भडका उडेल.

साैदी अरेबियाच्या यान्बू बंदराहून हे जहाज कच्चे तेल घेऊन निघाले होते. एक जहाज भारताकडे तर एक जहाज चीनकडे निघाले होते. मात्र, हूती बंडखोरांनी साैदीहून ये-जा करणाऱ्या जहाजांना धमकी दिली. ज्यामुळे अर्ध्या रस्त्यातून हे जहाज माघारी फिरले. सुएझ कालव्याच्या दिशेने हे जहाज वळली. या जहाजांना खूप जास्त मोठे वळण घेऊन यावे लागते. (affecting) ज्यामुळे खर्च अधिक होतो.मुळात म्हणजे होर्मुज खाडी पूर्णपणे बंद आहे. तांबडा समुद्र आणि यान्बू पाईपलाईन हेच मार्ग आता तेल पुरवठ्यासाठी राहिली आहेत. परिस्थिती जर अशीच राहिली तर मोठे संकट उभे राहू शकते. कारण तेल पुरवठ्याकरिता खर्च वाढला आहे. भारताला याचा थेट फटका बसत आहे. भारतात महागाई वाढण्याचे मोठे संकेत आहेत.कारण या मार्गाने तेल भारतात आणण्यासाठी मोठा खर्च आहे. सलग 11 व्या दिवशी अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला. (affecting) दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनली आहे. होर्मुज खाडी लगेचच सुरू होण्याचे कोणतेच संकेत नाहीत. हूती बंडखोरांनी बाब अल मंदेल मार्ग पुर्ण बंद केला नाही पण बंडखोरांकडून जहाजांना धमक्या दि्ल्या जात आहेत.

हेही वाचा :

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात ३ जण गंभीर जखमी?

मग अट्टहास कशासाठी केला?