बॉक्स ऑफिसवर ‘भूत बंगला’ची दहशत; 5 दिवसांत कमावले इतके कोटी

बॉक्स ऑफिसवर सध्या भूत बंगला या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेल्या या हॉरर कॉमेडीने प्रदर्शनाच्या अवघ्या पाच दिवसांतच दमदार कमाई करत आपली ताकद दाखवून दिली आहे. 17 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवला आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन ही हिट जोडी अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र आली आहे. याआधी ‘हेरा फेरी’, ‘गरम मसाला’, ‘भागम भाग’, ‘दे दना दन’ यांसारख्या चित्रपटांमधून या जोडीने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं, आणि ‘भूत बंगला’मधूनही त्यांनी तोच जादूई टच कायम ठेवला आहे.प्रदर्शनापूर्वी ‘धुरंधर : द रिव्हेंज’च्या यशामुळे या चित्रपटावर दबाव असल्याचं म्हटलं जात होतं. (box office) मात्र पेड प्रीव्ह्यूसह 16 कोटी रुपयांची ओपनिंग करत ‘भूत बंगला’ने जोरदार सुरुवात केली. पहिल्याच दिवशी 12.25 कोटींची कमाई करत चित्रपटाने आपली पकड मजबूत केली, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे 19 कोटी आणि 23 कोटींची कमाई झाली.

सोमवारी थोडी घसरण झाली असली तरी मंगळवारी पुन्हा चित्रपटाने गती पकडली. पाचव्या दिवशी 6.82 कोटींची कमाई करत या चित्रपटाने भारतात एकूण 71.57 कोटी रुपयांचा नेट कलेक्शन गाठला आहे, (box office) तर ग्रॉस कलेक्शन 85 कोटींच्या पुढे गेले आहे. विशेष म्हणजे, जागतिक स्तरावर या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पाही पार केला आहे. सुमारे 120 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटासाठी ही कमाई सकारात्मक मानली जात असून, लवकरच हा चित्रपट आपला खर्च वसूल करून नफ्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या चित्रपटात अक्षय कुमारसोबत परेश रावल, जिशू सेनगुप्ता, राजपाल यादव, तब्बू आणि वामिका गब्बी यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत.(box office) एकूणच, हॉरर आणि कॉमेडीचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्यात यशस्वी ठरत आहे.

हेही वाचा

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय