मोबाईलशिवाय मुलं जेवत नाही? स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी करा उपाय?

आजच्या डिजिटल युगात लहान मुलांच्या दैनंदिन जीवनात मोबाईल, टॅबलेट आणि टीव्हीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक पालक मुलांना जेवताना शांत ठेवण्यासाठी किंवा सहज जेवण व्हावे म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देतात. मात्र ही सोय हळूहळू सवय बनते आणि पुढे स्क्रीनच्या व्यसनात रूपांतर होऊ शकते. (Children) याचा परिणाम मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी अचानक मोबाईल काढून घेण्यापेक्षा तो टप्प्याटप्प्याने कमी करणे अधिक प्रभावी ठरते. दररोज काही मिनिटांनी स्क्रीन वापरण्याचा वेळ कमी केल्यास मुलांना नव्या सवयी सहज स्वीकारता येतात आणि त्यांचा विरोधही कमी होतो.जेवणाची वेळ ही कुटुंबासोबत संवाद साधण्याची संधी असावी. (Children) त्यामुळे जेवताना मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीन बंद ठेवून सर्वांनी एकत्र बसून जेवण करणे आवश्यक आहे. यामुळे मुलांचे लक्ष अन्नाकडे आणि कुटुंबीयांशी संवादाकडे वळते. मुलं मोठ्यांचे अनुकरण करत असल्याने पालकांनीही जेवताना मोबाईलचा वापर टाळणे महत्त्वाचे आहे.

मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी गोष्टी सांगणे, कविता म्हणणे, चित्रकला, वाचन, संगीत, सायकलिंग किंवा मैदानी खेळ यांसारख्या उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून घ्यावे. अशा उपक्रमांमुळे मुलांची सर्जनशीलता वाढते, शारीरिक हालचाल होते आणि स्क्रीनवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत मिळते.तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुलांना सतत रागावून किंवा जबरदस्तीने स्क्रीनपासून दूर ठेवण्याऐवजी त्यांच्यासोबत अधिक वेळ घालवणे, संवाद वाढवणे आणि पर्यायी मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देणे अधिक परिणामकारक ठरते. घरात सर्वांसाठी स्क्रीन वापरण्याचे स्पष्ट नियम ठरवून त्यांचे सातत्याने पालन केल्यास मुलांमध्ये संतुलित स्क्रीन वापरण्याची सवय विकसित होऊ शकते.योग्य सवयी, पालकांचा आदर्श आणि कौटुंबिक सहभाग यांच्या मदतीने मुलांचा वाढता स्क्रीन टाइम नियंत्रणात ठेवता येतो. (Children) त्यामुळे त्यांच्या डोळ्यांचे आरोग्य, एकाग्रता, मानसिक विकास आणि सामाजिक कौशल्ये अधिक चांगल्या प्रकारे विकसित होण्यास मदत होते.

हेही वाचा :

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात ३ जण गंभीर जखमी?

मग अट्टहास कशासाठी केला?