आता नवीन शिक्षणमंत्री कोण होणार? संजय राऊत यांनी थेट नावच सांगितलं?

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या निर्णयाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नव्हे, तर देशभरातील तरुणांच्या संघर्षाचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावरील निवेदनातून आपल्या राजीनाम्याची घोषणा करत NEET-UG 2026 परीक्षेतील कथित अनियमिततेची नैतिक जबाबदारी स्वीकारली.(political) परीक्षेनंतर तक्रारी समोर येताच केंद्र सरकारने तपास सीबीआयकडे सोपवला, परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि पुढील वर्षापासून NEET परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले.

दरम्यान, संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळेच सरकारला माघार घ्यावी लागल्याचा दावा केला. (political) त्यांच्या मते, दिल्लीतील जंतर-मंतरसह देशभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला. आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आणि अखेर सरकारला निर्णय बदलावा लागला.राऊत यांनी सरकारवर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला. आंदोलनाला बदनाम करण्यासाठी विविध प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्याचा दावा करत त्यांनी, लोकशाहीत जनआंदोलनाच्या ताकदीमुळे केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणे ही महत्त्वाची घटना असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती होऊ शकते, (political) असा दावा त्यांनी केला. मात्र या संदर्भात केंद्र सरकारकडून किंवा भाजपकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि नव्या शिक्षणमंत्र्याबाबतच्या चर्चांना वेग आला असून, केंद्र सरकारच्या पुढील निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात ३ जण गंभीर जखमी?

मग अट्टहास कशासाठी केला?