मुंबईत उद्या 26 जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेने विद्यार्थांच्या मागण्यांना पाठींबा देण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले. आता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर हा मोर्चा होणार की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी लाखो विद्यार्थी एकवटले होते. कॉकरोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनाला संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळाला. (Shiv Sena) देशाच्या वेगवेगळ्या भागात आंदोलन पुकारण्यात आले होते. मुंबईत उद्या 26 जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेने मोर्चाचे आयोजन केले. पण आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर हा मार्चा काढण्यात येणार की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Shiv Sena) त्यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.
आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे उद्याच्या मोर्चाविषयी म्हणाले की, ‘उद्याचा मोर्चा होणार आहे. उद्या मोर्चा काढतोय तर कालचा कार्यक्रम कशाला काढतो. पण हे जाहीर झाल्यावर अमित आणि आदित्यला लोकांनी मेसेज केला. आणि उद्या आणि आजही येणार आहे. उद्या ही ताकद मुंबईतून दाखवली पाहिजे. उद्याचा मोर्चा जो आहे, ते राज सांगेल.’
राज ठाकरे पुढे मोर्चाविषयी बोलताना म्हणाले की, ‘शिवाजी पार्क मैदानात वीर सावरकर मार्गावर व्यासपीठ असेल. (Shiv Sena) तिथेच जमणार आहोत. तरुणाईचा खूप मोठा विजय आहे. एका वाक्यात सांगायचं तर जेनजीने सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत. सरकारला जमिनीवर आणलं आहे. मला वाटतं हा खूप मोठा विजय तरुणांचा आहे. त्यात दीपकेंचा मोठा वाटा आहे. कोणत्याही गोष्टीला मस्तवालं उत्तर देणाऱ्या सरकारला माघार घ्यावी लागली. एवढं मोठं आंदोलन देशात उभं राहिलं. त्याचा जल्लोष झाला पाहिजे.’पुढे ते म्हणाले, ‘मी कालच म्हटलं होतं हा राग प्रधानावरून पंतप्रधानावर गेला आहे. यापुढचे काही निर्णय दीपके घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल. त्यांनीच निर्णय घ्यावा. त्यांनीच या गोष्टी सुरू केल्या आहेत. आमचा पाठिंबा असेल.’
हेही वाचा :
झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?