नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा, संपूर्ण राज्यात खळबळ?

एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेवर प्रश्नपत्रिका फुटीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.(leak) अहिल्यानगरमधील ऋषिकेश गांगर्डे यांनी हा आरोप केला आहे.नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा; संपूर्ण राज्यात खळब नीट पेपरफुटी, टीईटी पेपरफुटी प्रकरण संपूर्ण देशासहित राज्यात गाजत असताना आणखी एक धक्कायक प्रकार समोर आला आहे. एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेवर प्रश्नपत्रिका फुटीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अहिल्यानगरचे ऋषिकेश गांगर्डे यांनी धक्कादायक दावा केला आहे. गांगर्डे यांच्या दाव्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या पेपरफुटीविरोधात संपूर्ण देशात आंदोलने झाली. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी जंतरमंतरवर ठाण मांडलं होतं.(leak) त्यानंतर प्रधान यांना केंद्रीय मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. तर काही आठवड्यापूर्वी ठाण्यात टीईटीचा पेपर देखील फुटल्याचं समोर आलं होतं. त्या प्रकरणातही बिहारमधून एकाला अटक करण्यात आली होती.

सर्व घटना ताज्या असताना अहिल्यामधील ऋषिकेश गांगर्डे यांनी एमपीएससी औषध निरीक्षक भरतीची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा केला आहे. त्यांनी परीक्षेच्या दोन दिवस आधीच काही उमेदवारांकडे प्रश्न-उत्तरे असल्याचा आरोप केला आहे.(leak) व्हॉट्सअॅपद्वारे संभाव्य उत्तरे पाठविल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी गांगर्डे यांनी केली आहे.

हेही वाचा :

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात ३ जण गंभीर जखमी?

मग अट्टहास कशासाठी केला?