अभिजीत दिपके यांच्या निशाण्यावर राज्य सरकार? MPSC प्रकरणात केली मोठी घोषणा?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह विविध शहरांमध्ये परीक्षार्थींनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. MPSCच्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गोंधळ, रखडलेले निकाल, मुलाखती आणि नियुक्त्यांना होणारा विलंब तसेच वारंवार बदलणारे वेळापत्रक (regarding) यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.

या आंदोलनात आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही उडी घेतली आहे. दिपके यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून सरकारला इशारा दिला असून, विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. (regarding) त्यांनी MPSC विद्यार्थी प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच सीजेपीचे वरिष्ठ नेते सौरभ दास हे नोएडा येथे जाऊन प्रशासनाकडून पाच लाखांची नोटीस बजावण्यात आलेल्या अक्षत नावाच्या विद्यार्थ्याची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये पदांची संख्या वाढवावी, रखडलेले निकाल व नियुक्त्या तातडीने पूर्ण कराव्यात आणि प्रश्नपत्रिका फुटी व उत्तरतालिकेतील त्रुटींवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, (regarding) अशा मागण्या केल्या आहेत. सरकार आणि MPSCने तातडीने निर्णय न घेतल्यास पुण्यासह राज्यभरात जोरदार निदर्शने करण्याचा इशारा दिपके यांच्या सीजेपीने दिला आहे.

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय दिलं उत्तर?

एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का अधिकारात केली मोठी कपात?

कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलवर,पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले?