शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय थेट शेतात येऊन?

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. करपलेल्या पिकांच्या नुकसानीचे थेट शेतात येऊन सर्वेक्षण केले जाईल. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे ही पाहणी करतील, (farmers) ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे.

दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ज्या ज्या भागात उभी पिके करपून गेली आहेत. त्याचे सर्व्हेक्षण केलं जाणार आहे. थेट अधिकारी शेतात येऊन हे सर्व्हेक्षण करणार आहेत. काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन आणि मुख्य सचिवांना त्याबाबतचे आदेशच दिल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही महत्त्वाची माहिती दिली. ज्या ठिकाणी पावसाने दडी मारल्याने पिके करपली आहेत, त्याचं सर्व्हेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. (farmers) तसेच बळीराजाला नियमाप्रमाणे आवश्यक ती नुकसान भरपाई देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग तिघेही मिळून हे सर्व्हेक्षण करणार आहेत. हे संपूर्ण सर्व्हेक्षण झाल्यानंतर शेतकऱ्यांना निश्चित मदत करण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

मराठवाड्यात प्रमाणपत्र वाटप सुरू झालं आहे, त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रमाणपत्र देण्यासाठी यापूर्वी देखील कॅम्प लागले होते. सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला होता. सरकारने यापूर्वी जात प्रमाणात वितरित केले आहेत. जी नियमावली आहे, (farmers) त्यानुसार कॅम्प लावणे हे शासनाचे धोरणच आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. ओबीसींच्या मागण्यांवरही त्यांनी भाष्य केलं. त्यांनी मीडियात मागणी केली असेल. त्यांची मागणी अजून आमच्याकडे आली नाही. आमच्याकडे त्यांच्या मागण्या आल्यावर आम्ही त्या कमिटीसमोर ठेवू आणि त्यावर विचार करू, असं त्यांनी स्पष्ट केलं. राजस्थानच्या निवडणुकांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राजस्थानमध्ये 10 महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या. त्या ठिकाणी मी प्रभारी होतो. राजस्थानमधील दहाही नगरपालिका आम्ही जिंकू. नगरपंचायत नगरपालिकामध्ये आतापर्यंत आम्हाला विजय मिळाला नाही, त्यापेक्षा मोठा विजय 14 तारखेला दिसेल, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय दिलं उत्तर?

एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का अधिकारात केली मोठी कपात?

कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलवर,पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले?