80s फोटो ट्रेंड सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 2026 मधील फोटो काही क्षणांत 1980च्या दशकातील फोटोसारखे तयार करता येत असल्याने अनेकजण या ट्रेंड फॉलो करताना दिसत आहेत.

सोशल मीडिया स्क्रोल करताना सध्या सगळ्यांना फक्त एकच गोष्ट दिसत आहे, ती म्हणजे ’80s ट्रेंड’. हा ’80s ट्रेंड’ नक्की काय आहे, याची कदाचित तुम्हाला माहिती मिळाली असेलच. पण ज्यांना याबद्दल माहिती नाही, त्यांच्यासाठी थोडक्यात सांगायचे तर, याआधी जसा घिबली आणि नॅनो बनाना फोटो बनवण्याचा ट्रेंड आला होता, अगदी तसाच आता हा नवा ’80s फोटो ट्रेंड’ आला आहे. (photo trend) याच्या मदतीने तुम्ही आत्ताच्या काळातील म्हणजेच २०२६ मधील तुमचे फोटो थेट १९८० च्या दशकातील जुन्या फोटोंसारखे बनवू शकता.
आधीच्या ट्रेंडप्रमाणेच यासाठीही तुम्हाला काही ‘फोटो प्रॉम्प्ट’ लागतात. हे प्रॉम्प्ट टाकल्यानंतर तुम्ही हुबेहूब ८० च्या दशकातील व्यक्तींसारखे दिसू लागता आणि तुमच्या आसपासचा परिसरही अगदी तसाच दिसू लागतो. (photo trend) यामुळेच हा ट्रेंड सध्या झपाट्याने व्हायरल झाला आहे. पण सावधान! असे फोटो बनवताना तुम्हाला काही चुका करणे प्राधान्याने टाळायचे आहे. तसे न केल्यास तुम्हाला याचा मोठा फटका बसू शकतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमचे खाजगी आणि संवेदनशील फोटो अपलोड करण्याची चूक अजिबात करु नका. तुमचे किंवा तुमच्या कुटुंबियांचे अत्यंत खाजगी फोटो कोणत्याही प्लॅटफॉर्मवर अपलोड करणे टाळा. अशा एआय (AI) फोटो टूल्सवर तुमच्या खाजगी गोष्टी शेअर केल्यास, तुमची वैयक्तिक माहिती लीक होऊन बँक खाते हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच, या ट्रेंडच्या नावाखाली व्हायरल होणाऱ्या कोणत्याही धोकादायक लिंकवर चुकूनही क्लिक करु नका. जर तुम्हाला एखादे अनोळखी अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले जात असेल, तर अशावेळी अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, असे फोटो जनरेट करण्यासाठी कोणत्याही पासवर्ड, पिन किंवा ओटीपीची (OTP) आवश्यकता नसते. (photo trend) त्यामुळे कोणत्याही अनधिकृत साईटवर आपली खाजगी माहिती शेअर करु नका. या काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला कोणताही धोका उद्भवणार नाही. मात्र याव्यतिरिक्तही सोशल मीडिया वापरताना नेहमीच सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय दिलं उत्तर?
एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का अधिकारात केली मोठी कपात?
कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलवर,पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले?