मी आरक्षण सोडण्यास तयार केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली अट?

आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. (reservation) त्यांनी आरक्षण सोडण्यासाठी एक अट ठेवली असून, ती पूर्ण झाल्यास आपण आरक्षण सोडण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रमुख दलित चेहरा म्हणून आठवले यांच्या या विधानाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. दिल्लीमध्ये आरक्षण हटाओ अंतर्गत मोठं आंदोलन झाल्यानंतर त्यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये रामदास आठवले यांनी यावर भाष्य केलं. जातीय आधारावर आरक्षणाची तरतूद आहे. जर जातिवाद संपला, तर आम्ही आरक्षण सोडण्यास तयार आहोत. जो पर्यंत जातिवाद संपणार नाही, तो पर्यंत आरक्षण लागू राहील. विशेष म्हणजे आठवले यांनी गेल्या आठवड्यात झारखंडमध्येही अशाच प्रकारच वक्तव्य केलं होतं. रांची येथे बोलताना (reservation) त्यांनी जर जातिव्यवस्था संपली, तर आम्ही आरक्षण सोडण्यास तयार आहोत असं म्हटलं होतं.

ऑगस्ट महिन्यात राजधानी दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर आरक्षण व्यवस्थेच्या विरोधात मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. (reservation) यावेळी पोलिसांनी 50 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी जातीनुसार नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या लोकांना आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी केली होती. सोशल मीडियावरही ‘आरक्षण हटाओ आंदोलन’ या नावाने मोहीम सुरू करण्यात आली होती.

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय दिलं उत्तर?

एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का अधिकारात केली मोठी कपात?

कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलवर,पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले?