भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका पार पडली जी भारतीय संघाने जिंकली.(credit) या मालिकेतील तिन्ही टी-20 सामने भारतीय संघाने जिंकले आणि मालिका एकतर्फी विजयाने खिशात घातली. श्रेयस अय्यरला त्याच्या नेतृत्वात अखेर मालिका जिंकण्यात यश मिळाले. आता मालिका जिंकल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघाचे कौतुक होत आहे. या मालिकेत विशेष लक्ष होते ते वैभव सूर्यवंशीकडे. वैभव सूर्यवंशीने या मालिकेत दमदार कामगिरी केली. या मालिकेत त्याने अखेर त्याचा तोडफोड अंदाज दाखवून दिला. यामुळे वैभवला प्लेअर ऑफ द सिरीज हा पुरस्कारही मिळाला. वैभवला मालिकावीर हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने त्याचे क्रेडिट ज्यांना दिले त्याची आता जोरदार चर्चा सुरु आहे. वैभवच्या विधानाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात, वैभवने अवघ्या 19 चेंडूंमध्ये धमाकेदार (credit)अर्धशतक झळकावले. तिसऱ्या सामन्यात, त्याने संयमाने फलंदाजी करत 49 चेंडूंमध्ये 81 धावा केल्या आणि भारताला झिम्बाब्वेवर 3-0 ने क्लीन स्वीप मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतर सूर्यवंशी म्हणाला, “मला खूप छान वाटत आहे. हे माझे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. मला माझे पहिले ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कार मिळाले आहेत.
माझी येथील तयारी उत्कृष्ट होती. प्रशिक्षक, कर्णधार आणि संपूर्ण संघाने मला पूर्ण पाठिंबा दिला. मी माझा नैसर्गिक टी-20 खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. मी नेहमी संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न करतो आणि जर मला चांगली सुरुवात मिळाली, तर मी मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करतो. मी येथे 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतही खेळलो आहे आणि मला येथे फलंदाजी करायला आवडते. मी सरावात जे काही करतो, तेच सामन्यात करण्याचा प्रयत्न करतो.”
आता या मालिकेत कर्णधार हा तर श्रेयस अय्यरच आहे, पण कोच बदलण्यात आला होता. या मालिकेसाठी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी ही व्हीव्ही एस लक्ष्मणकडे सोपवण्यात आली होती.(credit)वैभवने जेव्हा त्याच्या खेळाचे क्रेडिट दिले तेव्हा कोचचा आर्वजून उल्लेख केला. यावरुन असे समजते की त्याला व्हीव्ही एस लक्ष्मणकडून बिनधास्त खेळ असा पाठिंबा मिळाला होता. जो वैभवला कदाचित गौतम गंभीर यांनी दिला नसावा.
हेही वाचा :
झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?