CJP, शेतकरी, विरोधकानंतर दिल्लीत अजून एक मोठे आंदोलन घोंगावत आहेत. E20 पेट्रोलविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे. E20 जनता पार्टी नावाने एका पक्षाची चर्चा सुरू झाली आहे. धर्मेंद्र प्रधान यांची विकेट पडल्यानंतर नितीन गडकरी अडचणीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. काय आहे अपडेट?

UG-NEET पेपर लीक प्रकरणात सरकारमधील धर्मेंद्र प्रधान यांची विकेट पडली. विरोधकांनी आंदोलन गुंडाळले. पण जंतरमंतर नवीन वादळासाठी सज्ज होत असल्याचा दावा केला जात आहे. देशात E20 पेट्रोलविरोधात, इथेनॉल मिश्रित पेट्रोलविरोधात नवीन आंदोलनाचा हुंकार ऐकू येत आहे. (Discussions) यावरून राजकारण तापले आहे. आम आदमी पक्षाने (AAP), काँग्रेस आणि दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनने सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीयस्तरावर लोकअभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर उत्तर प्रदेश काँग्रेसने सरकार मधील दोन केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना E20 धोरणावरून सोशल मीडियावर करण्यात येत असलेल्या कथित मानहानी आणि डीपफेक दाव्यांविरोधात कारवाईची परवानगी दिली आहे.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी E20 पेट्रोल धोरणाविरोधात आक्रमक अभियानाची घोषणा केली आहे. दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये AAP, National Town Hall Against E20 चे आयोजन करणार आहे. (Discussions)यामध्ये ऑटोमोबाईल तज्ज्ञ, वाहनधारक आणि या पेट्रोलमुळे प्रभावित लोकांना बोलवण्यात आलेले आहे. केजरीवाल यांच्या म्हणण्यांनुसार, E20 धोरण मागे घेण्यासाठी करण्यात येत असलेल्या ऑनलाईन याचिकेवर आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी हस्ताक्षर केले आहेत. 1 ऑगस्टच्या बैठकीनंतर केजरीवाल याविषयीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोपवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
देशात E20, इथेनॉल मिश्रीत पेट्रोलविरोधात दिल्लीतील टॅक्सी आणि पर्यटन वाहतूक व्यावसायिकांनी संसेदवर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनने 4 ऑगस्टला मोर्चाची हाक दिली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी याविषयीची घोषणा केली. सरकारने हा निर्णय लादल्याचा असोसिएशनचा आरोप आहे. E20 पेट्रोलमुळे अनेक वाहनांचे मायलेज कमी झाले आहे. देखभाल खर्चही वाढला आहे. इंजिनाचे कार्यक्षमतेवर मोठा परिणाम झाल्याचा आरोप सम्राट यांनी केला आहे. 2015 पूर्वी तयार करण्यात आलेली वाहनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी डिझाईन केलेली नसल्याचा दावा त्यांनी केला. हा निर्णय त्वरीत मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांना मंत्रिमंडळातून तात्काळ हटवावे अशी मागणी राय यांनी केली आहे. देशातील 35 कोटी वाहन मालकांचा विरोध असताना, (Discussions) त्यांनी चिंता व्यक्त केली असतानाही सरकार आता E85 आणि E100 इंधन धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे. पेट्रोलमध्ये भेसळ आणि इंजिनाला होत असलेल्या नुकसानीसाठी सरकारने जबाबदारी निश्चित करण्याची मागणी राय यांनी केली आहे.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?