एकीकडे साखरेचे दर वाढत असतानाच ऐनसणाच्या काळात गूळाच्या दरातही किलोमागे सात ते दहा रूपयांची वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गूळात कृत्रिम रंग व रसायन वापरावर नियंत्रण आणल्याने रंगहीन गुळाची आवक सांगली बाजारात होत असून आज सौद्यामध्ये गूळाला ४८०० ते ५ हजार ३०० रूपये क्विंंटलला दर मिळाला.

सांगलीच्या बाजारात प्रामुख्याने कनार्र्टकातून गूळ सौद्यासाठी येत असून रोज सुमारे १०० ते १२५ टन गूळ आवक होत आहे. रविवार वगळता दररोज गूळ सौदे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काढण्यात येत असून एकेका अडत व्यापार्याच्या दुकानात दहा ते बारा टन गूळ सौदे होत आहेत.कर्नाटकातून आवक होत असलेल्या गूळाचे दहा दिवसापुर्वी प्रति क्विंटल ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रूपये होते. सोमवारी झालेल्या सौद्यामध्ये रंगहीन गूळाला प्रतवारीनुसार प्रति क्विंटल ४ हजार ८०० ते ५ हजार ३०० रूपये दर मिळाला. गूळाच्या वाढत्या दरामुळे किरकोळ बाजारात गेल्या आठ दिवसापुर्वी गूळाला ५० ते ५३ रूपये किलोने मिळणार्या गूळासाठी आता ५७ ते ६० रूपये मोजावे लागत आहेत. (Sangli) दुसर्या बाजूला देशांतर्गत मागणी वाढल्याने साखरेच्या दरातही वृध्दी झाली असून ठोक साखरेचे सोमवारी प्रतिक्विंटल ४९०० रूपये झाले असून किरकोळ बाजारात किलोचे दर ५२ ते ५३ रूपये आहेत.
उसाच्या रसापासून गूळ तयार करत असताना साखरेचे मिश्रण केले जात असल्याने साखरेचे दर वाढताच गूळाचे दरही वाढले आहेत. महाराष्ट्रीय बेंदूर आज पार पडल्यानंतर श्रावणातील विविध वृत्तवैकल्ये, सण यानंतर येणारा गणेशाोत्सव, दसरा या सणाला पुरण पोळीसाठी गूळाची मागणी अधिक असते. (Sangli) याच कालावधीत दरवाढ झाली आहे. बाजारात साखरेपेक्षा गूळाचे दर अधिक आहेत.दरम्यान, बाजारात सेंद्रिय गूळालाही चांगली मागणी असून याचे दर ७० ते १२० रूपये प्रतिकिलो आहेत. यामध्ये रसायन व नैसर्गिक रंगात तयार करण्यात आलेला गूळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता उत्पादित केलेल्या उसापासून तयार करण्यात आलेल्या आणि विविध स्वादाचे गूळाचे दर प्रतिकिलो १०० ते १२० रूपये किलो आहेत.
(Sangli) याशिवाय गूळ भुकटी व कॅन्डी स्वरूपातही गूळ बाजारात असून बडिशेप, सूंठ व चॉकलेट चवीचे गूळही ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. सांगली बाजारात सौद्यासाठी कर्नाटकातून गूळाची मोठी आवक आहे. चांगल्या प्रतीच्या गूळाला मागणीही चांगली असून दरही चांगले मिळत आहेत. रंगहीन गूळाला यापुर्वी गुजरातमधून मागणी जास्त होती. आता केसरी, पिवळा, लाल रंगाचा गूळच विक्रीसाठी नसल्याने स्थानिक व्यापारी याच गूळाची खरेदी करत आहेत
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?