कोल्हापूर कला आणि संस्कृतीचा वारसा लाभलेल्या कोल्हापूर शहरात आता संघर्षाचे ढग दाटले आहेत. शहरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाचा घाट घातल्यामुळे कोल्हापुरातील रंगकर्मी, कलाकार आणि नाट्यप्रेमी संतप्त झाले आहेत. खाजगीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करावा, (Kolhapur) नाट्यगृहाचे व्यवस्थापन खाजगी संस्थेच्या हाती देण्याचा घाट तातडीने थांबवावा या मागणीसाठी मंगळवारी रंगकर्मींनी उपोषण केले.

हा सांस्कृतिक वारशावर घाला असल्याचा आरोप करत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, राज्य नाट्य परिषद कोल्हापूर शाखा, स्थानिक रंगकर्मींनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. कोल्हापूर महापालिकेने हे खासगी न करता रंगकर्मींच्या सहकार्याने चालवावे, अशी मागणी होत आहे.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ही वास्तू कलाप्रेमातून साकारली आहे. दोन वर्षांपूर्वी लागलेल्या भीषण आगीनंतर या नाट्यगृहाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. कोल्हापूर महापालिकेने देखभाल व आर्थिक दरीचे कारण देत व्यवस्थापन बाह्य, खासगी संस्थेकडे देण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. या निर्णयाच्या तीव्र निषेधार्थ नाट्यकर्मींनी नाट्यगृहाबाहेर उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
केशवराव भोसले नाट्यगृह हे केवळ एक वास्तू नसून कोल्हापूरच्या नाट्य संस्कृतीचा कणा आहे. पिढ्यानपिढ्या नवोदित कलाकारांना घडवणारे हे व्यासपीठ खाजगी हातात गेल्यास सर्वसामान्य कलाकारांना आणि नाट्यसंस्थांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल, (Kolhapur) अशी भीती आंदोलक रंगकर्मींनी आंदोलनावेळी व्यक्त केली आहे. व्यावसायिक फायद्यासाठी सांस्कृतिक वारसा विकू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत कलाकारांनी घेतला आहे. महापालिकेन या ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि संवर्धन करावे. नाट्यगृहाचे भाडे आणि नियम सर्वसामान्य व स्थानिक कलाकारांच्या परवडणारे असावेत, अशीही मागणी होत आहे.
खाजगीकरणाचा प्रस्ताव पूर्णपणे मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहील, असा इशारा उपोषणकर्त्या रंगकर्मींनी दिला आहे. या आंदोलनाला शहरभरातून विविध सामाजिक संघटना व नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू असतानाच रिस्टोरेशनच्या कामातील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. ज्या पाठीमागील भिंतीला आगीमुळे सर्वाधिक फटका बसला होता, (Kolhapur) त्याच भिंतीवरील तडे आजही कायम असून काही ठिकाणी ते अधिक रुंदावल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या भिंतींच्या रिस्टोरेशनचे काम पूर्ण झाल्याचे दाखवत सुमारे सात कोटी रुपयांचे बिलही संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे. त्यामुळे ‘काम न करता बिलाचा मलिदा कोणाच्या आशीर्वादाने’ असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?