राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी काल अमित शाह यांची भेट घेतली. तसेच प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांनी संसदेत शरद पवारांशी संवाद साधला होता. (Congress) यानंतर विलीनीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला गेला. मात्र या चर्चा शरद पवार यांनी फेटाळून लावल्या आहेत. मंगळवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याचा संबंधच नाही, असे म्हटले.

या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्लीत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे या विषयासंबंधीचा संभ्रम वाढला होता. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. मात्र या भेटीची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सुनील तटकरे यांनी आपल्या एक्स हँडलवर भेटीचा फोटो शेअर केला असून ही सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी म्हटले.सुनील तटकरे यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अमित शाह यांची भेट घेतली होती. रेवती सुळे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतल्याचे सांगितले गेले. (Congress) तसेच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मांडला असल्याचे सांगितले गेले.दरम्यान सुप्रिया सुळे यांनीही दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा मुद्दा काही दिवसांपूर्वी फेटाळून लावला होता.

मात्र केंद्र सरकारच्या विविध नेत्यांशी वाढलेल्या गाठीभेटींमुळे या चर्चांना जोर धरू लागला आहे. २० जुलै रोजी जंतर-मंतरवरील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी अभिजीत दिपकेंची भेट घेतली होती. या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान आपण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन त्यांच्याशी संवाद साधायला हवा, अशी भूमिका मांडल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. (Congress) तसेच देशातील आणि महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील प्रशासकीय व धोरणात्मक त्रुटी, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या व विविध प्रलंबित मागण्या या गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे शरद पवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले होते.

बुधवारी संसदेत शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची भेट झाली असल्याची बातमी द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी पक्षाचे नेते भेटत असताना या भेटीलाही महत्त्व प्राप्त झाले. दरम्यान या भेटीमागचाही उद्देश समोर आलेला नाही. मात्र प्रफुल पटेल आणि शरद पवार यांचा राज्यसभा सभागृहातील फोटो समोर आला आहे. शरद पवार गटातील नेते आणि पवार कुटुंबातील सदस्य रोहित पवार यांनी मात्र एनडीएबरोबर जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. १० ऑगस्ट रोजी दिल्लीत रेवती आणि सारंग लखानी यांच्या लग्नाचे रिसेप्शन होत आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी पक्षाचे नेते विविध नेत्यांची भेट घेत असावेत, असे ते म्हणाले. शरद पवार एनडीएबरोबर जाणार नाहीत. आमचे बहुसंख्य आमदार-खासदार लढाईला तयार आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?