पेठवडगाव पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा परिसरात बुधवारी (दि.२९) पुन्हा एकदा एसटी बसचा अपघात झाला. सलग दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी एसटी बस अपघातग्रस्त झाल्याने या परिसरातील वाहतूक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडे जाणारी राजापूर आगाराची राजापूर–पुणे एसटी बस (क्र. एमएच १३ सीयू ७८३०) अंबप फाटा परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या काँक्रीट बॅरिकेडवर जाऊन धडकली. (accident) या अपघातात बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून बसमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
विशेष म्हणजे, मंगळवारीही याच ठिकाणी ब्रेक निकामी झाल्याने एका प्रवासी बसचा अपघात झाला होता. (accident) त्यानंतर काही तासांतच झालेल्या दुसऱ्या अपघातात एका दुचाकीस्वार महिलेला दुखापत झाली होती. या घटनांनंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा एसटी बसचा अपघात झाल्याने अंबप फाटा परिसर अपघातप्रवण ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी या भागातील सुरू असलेली रस्त्याची कामे, अपुरी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजनातील त्रुटी आणि दिशादर्शक फलकांचा अभाव (accident) यामुळे अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप केला आहे. या ठिकाणी तातडीने प्रभावी सुरक्षा उपाययोजना राबवून वाहतूक नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया म्हणाले?
बदली, मानधनी १,१९८ कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा निर्णय लांबणीवर?