‘छातीकडे टक लावून पहायचा’ नाशिक TCS कंपनीतील पीडितांचं बोलणं ऐकून झोपच उडेल, एकेक कारनामे

नाशिक येथील कार्यालयात घडलेल्या कथित प्रकारांमुळे आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कंपनीतील एका महिला टीम लीडरने पुढे येत चार वर्षे सातत्याने लैंगिक छळ, अश्लील टिप्पणी आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणातील तिचा जबाब समोर आल्यानंतर संपूर्ण घटनेची व्याप्ती अधिकच धक्कादायक असल्याचे स्पष्ट होत आहे.

११ वर्षांपासून कंपनीत कार्यरत असलेल्या या महिलेने सांगितले की, गेल्या चार वर्षांत तिला वारंवार अपमानास्पद वर्तनाचा सामना करावा लागला. तिच्या खासगी आयुष्याबाबत लाजीरवाण्या टिप्पणी केल्या जात होत्या, तर कार्यस्थळी तिच्याकडे अयोग्य नजरेने पाहणे आणि अस्वस्थ करणारे वागणे ही रोजची बाब झाली होती. तिने वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप तिने केला आहे.

या प्रकरणात आधीच काही कर्मचाऱ्यांच्या गटाने महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून त्यांचा छळ केल्याचे समोर आले होते. मात्र आता टीम लीडर पदावर कार्यरत असलेल्या महिलेनेही समान प्रकारचा अनुभव सांगितल्याने हा प्रश्न केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांकडून महिलांवर अश्लील शेरेबाजी, (Nashik) त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर टिप्पणी तसेच धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, ती नाशिक शाखेत टीम लीडर म्हणून काम करत असून अनेक सहकाऱ्यांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. कार्यालयातील वातावरण काही काळापासून अस्वस्थ करणारे होते आणि काही कर्मचाऱ्यांनी एकत्र येत इतरांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याची प्रवृत्ती वाढल्याचे तिने नमूद केले.

२०२२ मधील एका घटनेचा उल्लेख करताना तिने सांगितले की, मीटिंगदरम्यान एका सहकाऱ्याने तिच्याकडे अयोग्य पद्धतीने पाहत हसल्यामुळे ती प्रचंड अस्वस्थ झाली होती. या घटनेची तिने वरिष्ठांकडे तक्रारही केली होती; मात्र संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ विभाग बदलण्यापुरतीच मर्यादित कारवाई करण्यात आल्याचा आरोप आहे. (Nashik) त्यानंतरही संबंधिताचे वर्तन बदलले नाही, असेही ती म्हणाली.

फेब्रुवारी २०२६ मधील आणखी एका प्रसंगाचा उल्लेख करताना पीडितेने सांगितले की, वैयक्तिक आरोग्याशी संबंधित अत्यंत संवेदनशील परिस्थितीत असताना एका सहकाऱ्याने केलेल्या टिप्पणीमुळे ती मानसिकदृष्ट्या खचून गेली. (Nashik) त्या वेळी सहानुभूती दाखवण्याऐवजी केलेल्या सूचनांनी तिच्या भावनांना धक्का बसल्याचे तिने स्पष्ट केले.या सर्व आरोपांमुळे कार्यस्थळी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, तक्रारींवर वेळेवर आणि कठोर कारवाई न झाल्यास अशा घटना कशा वाढतात याकडे लक्ष वेधले जात आहे. संबंधित प्रकरणात पुढील चौकशी आणि कंपनीकडून अधिकृत प्रतिक्रिया काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला

अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन

शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ते आयुष्याचं एक पान