आज, गुरुवार, २३ एप्रिल २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत असूनही, भारतीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती असतानाही, (price) देशांतर्गत इंधन दरांमध्ये आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ग्राहकांना अचानक दरवाढीचा धक्का बसू नये यासाठी तेल कंपन्या स्वतः आंतरराष्ट्रीय चढ-उतारांचा भार पेलत आहेत.
नवी दिल्ली (New Delhi): पेट्रोल ₹९४.७२ | डिझेल ₹८७.६२
मुंबई (Mumbai): पेट्रोल ₹१०४.२१ | डिझेल ₹९२.१५
पुणे: पेट्रोल ₹१०४.८३ | डिझेल ₹९१.३५
कोलकाता (Kolkata): पेट्रोल ₹१०३.९४ | डिझेल ₹९०.७६
चेन्नई (Chennai): पेट्रोल ₹१००.७५ | डिझेल ₹९२.३४
हैदराबाद (Hyderabad): पेट्रोल ₹१०७.४६ | डिझेल ₹९५.७०
पाटणा (Patna): पेट्रोल ₹१०५.५८ | डिझेल ₹९३.८०
बंगळूर (Bengaluru): पेट्रोल ₹१०२.९२ | डिझेल ₹८९.०२
चंदीगड (Chandigarh): पेट्रोल ₹९४.३० | डिझेल ₹८२.४५
जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड च्या किमती सध्या प्रति बॅरल ९८ ते १०० डॉलरच्या आसपास फिरत आहेत. इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. (Price )मात्र, आगामी विधानसभा निवडणुका आणि महागाई नियंत्रण लक्षात घेता, केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांनी सध्या तरी किमती वाढवण्याचे टाळले आहे.
भारतात इंधनाचे दर दररोज सकाळी ६ वाजता सुधारले जातात. पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्र सरकारचे उत्पादन शुल्कसंपूर्ण देशात सारखे असले, (Price) तरी प्रत्येक राज्य सरकार त्यावर स्वतंत्रपणे व्हॅट किंवा विक्री कर आकारते. याव्यतिरिक्त मालवाहतूक खर्च आणि डीलरचे कमिशन यामुळे एकाच राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये दरात तफावत दिसून येते.
हेही वाचा
मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला
अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन
शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ते आयुष्याचं एक पान