1 ऑगस्टपासून LPG सिलेंडरचे नियम बदलणार, जाणून घ्या नवे नियम?

देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. इंडेन , एचपी गॅस (HP Gas) आणि भारत गॅस ग्राहकांना केवळ गॅसच्या किमतीतील बदलच नव्हे, तर e-KYC, घरपोच सिलेंडर वितरण आणि प्रमाणीकरण प्रक्रियेतही नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. या बदलांचा थेट परिणाम कोट्यवधी ग्राहकांवर होणार असून, डिलिव्हरी प्रक्रियाही अधिक कडक केली जाणार आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरानुसार घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती जाहीर करतात. (LPG cylinder) त्यामुळे 1 ऑगस्टपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडर तसेच व्यावसायिक सिलेंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांसह हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावरही होणार आहे. यासोबतच e-KYC प्रक्रियेलाही अधिक महत्त्व देण्यात आले आहे. गॅस सिलेंडरचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅस ग्राहकांनी e-KYC पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल, त्यांना गॅस सबसिडी मिळण्यात अडथळे येऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये गॅस कनेक्शन तात्पुरते बंद होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. अधिकृत मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून e-KYC पूर्ण करण्याचा सल्ला कंपन्यांकडून देण्यात आला आहे.

1 ऑगस्टपासून घरपोच गॅस सिलेंडर वितरणासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड प्रणाली अधिक कठोर करण्यात आली आहे. ग्राहकाने सिलेंडर बुक केल्यानंतर त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वन-टाईम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल. सिलेंडर स्वीकारताना हा OTP डिलिव्हरी कर्मचाऱ्याला दाखवणे बंधनकारक असेल. OTP पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच ग्राहकाला सिलेंडर दिला जाणार आहे. (LPG cylinder) याशिवाय व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरही अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. व्यावसायिक गॅस कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या ग्राहकाला पुरवण्यात आला, (LPG cylinder) याची माहिती संबंधित गॅस एजन्सींना तेल कंपन्यांकडे सादर करावी लागणार आहे. एलपीजी वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढवणे आणि काळाबाजाराला आळा घालणे, हा या नव्या नियमांचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा :

कर्मचाऱ्याचा ऑनड्युटी खून?

2 मिनिटांत सोलून होईल लसूण, फक्त सोप्या ट्रिक्सचा करा अवलंब?

अनिल परब यांना मोठा दिलासा, मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता?