कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रंकाळा तलाव आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील वाहतूक मार्गात बदल केले. (Ambabai Temple) हे दोन्ही परिसर ‘नो पार्किंग झोन’ केले असून, गुरुवारपासून याची अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली.

बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार रोडवर जाण्यास रिक्षासह चारचाकी, रिक्षांना प्रवेश बंद केला आहे. जोतिबा रोडवर सर्वच वाहनांना प्रवेश बंद असेल. (Ambabai Temple) महालक्ष्मी बॅंकेकडून दक्षिण दरवाजाकडे जाण्यास सर्व वाहनांना मनाई असेल. गाडगे महाराज पुतळ्याकडून जुना राजवाड्याकडे जाण्यास दुचाकींना मनाई करण्यात आली आहे. मालवाहतुकीसाठी दुपारी १ ते ३ आणि रात्री नऊ ते सकाळी नऊ या वेळेतच प्रवेश दिला जाईल. स्थानिक व्यापाऱ्यांनी याच वेळेत आपल्या मालाची वाहतूक करावी, असे आवाहन केले आहे.
रंकाळा परिसर नो पार्किंग झोन शालिनी पॅलेस ते रंकाळा टॉवर, जुना वाशी नाका ते रंकाळा टॉवर या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. रंकाळा टॉवर ते रंकाळा स्टॅन्ड तर ताराबाई रोड ते रंकाळा टॉवर हे मार्ग मध्यम व अवजड (Ambabai Temple) वाहनांसाठी एकेरी करण्यात आले
2 मिनिटांत सोलून होईल लसूण, फक्त सोप्या ट्रिक्सचा करा अवलंब?
अनिल परब यांना मोठा दिलासा, मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता?